मोठी बातमी ! आता ‘या’ मार्गावर पण धावणार वंदे भारत ट्रेन, ‘ही’ 9 शहरे कनेक्ट होणार, पहा…

देशाला आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. महत्वाची बाब म्हणजे या गाडीचा रूट अंतिम झाला असून मे महिन्यात या गाडीचे वेळापत्रक सुद्धा फायनल केले जाणार आहे. तसेच ही गाडी जून महिन्यात सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही देशातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन, ही ट्रेन मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत डेव्हलप करण्यात आली आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली.

सध्या देशातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू असून आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, राज्याला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या गाडीसाठी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री मुरलीधर मोहोळ हे पाठपुरावा करत आहेत. दुसरीकडे मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकंदरीत या दोन गाड्या सुरू झाल्या तर मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे जाळे फारच मजबूत होणार आहे. अशातच आता देशाला आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन? 

देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही गाडी येत्या काही दिवसात प्रत्यक्षात रुळावर धावताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार जून महिन्यात नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. ही नवी गाडी मध्यप्रदेश राज्यात सुरू होणार आहे.

येथील भोपाल ते लखनौ दरम्यान ही सेमी हाय स्पीड ट्रेन धावणार अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, भोपाल ते लखनऊ दरम्यान सुरू केली जाणारी वंदे भारत ट्रेन इंदूरपासून सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

स्वतः इंदूरचे खासदार शंकर लालवानी यासाठी आग्रही आहेत. या भागातील रेल्वे प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी जोर धरत असल्याने इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी ही वंदे भारत ट्रेन इंदूर रेल्वे स्थानकातून सुरू करावी या अनुषंगाने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे.

दरम्यान या मार्गावर म्हणजेच इंदोर ते लखनऊ या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते मात्र सध्या या मार्गावर फक्त चार गाड्या धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास फारच आव्हानात्मक बनतोय. या पार्श्वभूमीवर जर इंदोर ते लखनऊ दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.

यामुळेच प्रस्तावित करण्यात आलेली भोपाळ ते लखनऊ ही वंदे भारत ट्रेन इंदूर मधून सोडण्याची आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या या मागणीवर रेल्वे बोर्डाकडून आता गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

या 9 शहरांमधून धावणार नवी वंदे भारत 

ही प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस कोण कोणत्या स्थानकांमधून धावणार असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात होता. तर मीडिया रिपोर्ट्स मध्ये ही गाडी भोपाल, बीना, झांसी, कानपूर, लखनौ अशा सुमारे नऊ प्रमुख शहरांना जोडणार असा दावा करण्यात आला आहे.

तसेच प्रस्तावित करण्यात आलेली ही नवी वंदे भारत ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालवले जाणार असून या गाडीचे वेळापत्रक येत्या काही दिवसांनी अंतिम केले जाईल आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही गाडी सुरू होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe