मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार 2 वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट? वाचा….

वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन राज्यातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांमधून धावताना दिसेल. शिवाय उत्तर प्रदेश मधील लखनऊ ते इंदोर आणि निजामुद्दीन ते इंदोर या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे.

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून आता याच एक्सप्रेस ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच रुळावर धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या देशात ज्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र आता देशातील रेल्वे प्रवाशांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जाणार असून देशातील मुंबई, पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरांना या गाड्यांची भेट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये मुंबई ते दिल्ली आणि पुणे ते नागपूर दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेश राज्याला देखील दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागाला दोन महिन्यात तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. यापैकी दोन वंदे भारत एक्सप्रेस या स्लीपर असतील आणि एक गाडी ही चेअर कार प्रकारातील राहणार आहे.

त्यासाठी आता रेल्वे कडून चाचणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान आता आपण या तीनहीं वंदे भारत एक्सप्रेसचा रूट नेमका कसा राहणार ? याबाबत माहिती पाहणार आहोत.

कसा असणार रूट?

मीडिया रिपोर्टनुसार उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ स्टेशनवरून दोन वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहेत. तर हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून एक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेसला कवच सिस्टिम राहणार आहे.

दरम्यान आता लवकरच या वंदे भारत एक्सप्रेस साठी संबंधित स्थानकावरून टेस्टिंग सुद्धा सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

लखनौ ते इंदोर या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही वंदे भारत स्लीपर आग्रा मार्गे धावेल. ही ट्रेन 747 किमीचा प्रवास फक्त 14 तासात पार करेल. ही गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांचे तीन तास वाचणार आहेत.

यासोबतच निजामुद्दीन ते इंदोर या मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस धावताना दिसेल. या दोन शहरांमधील 824 किमीचे अंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन फक्त 14 तासात कापू शकते. या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी देखील तीन तासांनी कमी होणार आहे.

या मार्गावर धावणार चेअर कार प्रकारातील वंदे भारत

दुसरीकडे, लखनौ ते जयपूर या मार्गावर चेअर कार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही गाडी 567 किलोमीटरचे अंतर फक्त दहा तासात पूर्ण करणार आहे. या प्रवासात देखील प्रवाशांचे तीन तास वाचतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe