Vande Bharat Train Ticket Rule : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतभर गाजलेली ट्रेन. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
सध्या स्थितीला देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे. आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालण सुरु आहे.
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान जर तुम्ही ही वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट रद्द केल्यास रेल्वे कडून किती शुल्क वसूल केले जाते यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
रेल्वे किती शुल्क वसूल करते?
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट रद्द केल्यानंतर रेल्वे तुमच्याकडून तिकिटाच्या मूळ किमतीमधून 180 रुपये कॅन्सलेशन चार्ज आकारते आणि उर्वरित रक्कम परत करते.
तसेच तुम्ही वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बुक केलेले तिकीट रद्द करत असाल तर तुमच्या तिकिटाच्या मूळ किमतीतून 240 रुपये कापले जातात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तिकिटाच्या मूळ किमती मधून हे कॅन्सलेशन चार्ज वसूल केले जाते.
रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला तिकीट बुक करताना आकारलेले आरक्षण शुल्क आणि जीएसटी परत करत नाही. म्हणजे तिकीट बुक करताना जे आरक्षण शुल्क आणि जीएसटी तुमच्याकडून वसूल केला जातो त्याचे पैसे तिकीट रद्द केल्यास मिळत नाहीत.
याऊलट तुमच्या तिकिटाच्या मूळ किमती मधून कॅन्सलेशन चार्ज कापले जाते. त्यामुळे जर तुम्ही ही वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत असाल आणि भविष्यात कधी तुम्हाला त्याचे तिकीट काही कारणास्तव रद्द करावे लागले तर तुम्हाला हा आर्थिक फटका सहन करावा लागेल.