ब्रेकिंग ! मुंबईहुन धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्स्प्रेसला नव्या Railway Station वर थांबा मंजूर, वेळापत्रकातही झाला बदल

Published on -

Vande Bharat Train : मुंबईहून धावणाऱ्या एका वंदे भारत ट्रेनला एक नवीन थांबा मंजूर करण्यात आला आहे. सध्या मुंबईहून सहा वंदे भारत ट्रेन धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगरी शिर्डी यादरम्यान सध्या वंदे भारत ट्रेन सुरू असून यापैकी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत आता एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता आनंद स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. खरे तर आनंदचे खासदार मितेश पटेल यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली होती.

खासदार महोदयांनी आपल्याला रेल्वे मंत्र्यांकडून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन ला आनंद रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याचे सांगितले होते.

मात्र खासदार महोदयांच्या या घोषणेनंतरही रेल्वे कडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढले जात नव्हते आणि यामुळे साहजिकच प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती तयार झाली होती.

पण, आता रेल्वे बोर्ड कडून याबाबतची नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. यानुसार मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला 23 मार्च 2025 पासून एक नवीन थांबा मंजूर करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही वंदे भारत ट्रेन आता आनंदस्थानकावर थांबणार असून हा बदल 23 मार्चपासून लागू होणार आहे.

ही गाडी आता नवीन स्थानकावर थांबणार असल्याने साहजिकच याचा वेळापत्रकावर सुद्धा बदल होणार आहे. दरम्यान आता आपण पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या या ट्रेनच्या नव्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कसं राहणार नवीन वेळापत्रक?

पाश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 20901 जी दररोज मुंबईहून सकाळी सुटते, ती आनंद स्थानकावर सकाळी 10.38 वाजता पोहोचेल आणि 10.40 वाजता पुढील प्रवासासाठी निघेल.

मुंबई ते आनंद दरम्यानच्या इतर स्थानकांचे वेळापत्रक बदलण्यात आलेले नाही. तर, गाडी क्रमांक 20902 जी गांधीनगर कॅपिटल ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावते, तिच्या वेळेत थोडासा बदल करण्यात आला आहे.

आधी अहमदाबाद स्थानकावर दुपारी 2.50 वाजता पोहोचणारी आणि 3.00 वाजता सुटणारी ही गाडी आता 2.45 वाजता पोहोचेल आणि 2.55 वाजता सुटेल. आनंद स्थानकावर ती दुपारी 3.30 वाजता पोहोचेल आणि 3.32 वाजता पुढे निघेल.

परिणामी, मुंबईत तिचे आगमन पूर्वीपेक्षा 5 मिनिटांनी उशिरा, म्हणजेच संध्याकाळी 8.30 वाजता होईल. मात्र, इतर कोणत्याही स्थानकाच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe