Vande Bharat Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यावर्षी देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. Vande Bharat Train बाबत बोलायचं झालं तर ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये रुळावर धावताना दिसली.
ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली केली आणि त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गाडी सुरू झाली. या ट्रेनमुळे अनेक राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत. ही गाडी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली आहे.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी नागपूर ते सिकंदराबाद नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
दरम्यान आता राज्याला 2025 मध्ये आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी पुण्यावरून एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे बिहारच्या प्रवाशांसाठी मोठी भेट देणार अन यंदा बिहार मधून 6 नव्या ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
यात वंदे भारत ट्रेन चा सुद्धा समावेश आहे. या वर्षी पटना ते दिल्ली, पटना ते पुणे, पटना ते बेंगळुरू आणि पटना ते हैदराबाद या अशा प्रमुख मार्गांवर सहा नवीन गाड्या सुरू करण्याची योजना आखली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात एक स्लीपर वंदे भारत ट्रेन, चार सुपरफास्ट गाड्या आणि एक फास्ट पॅसेंजर ट्रेनचा समावेश असेल, असेही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या गाड्यांच्या संचालनासाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्यांचा शुभारंभ होणार आहे. रेल्वेच्या सूत्रांनुसार, नवीन गाड्या पटना येथील राजेंद्र नगर टर्मिनल आणि दानापूर स्टेशनवरून धावतील. यामध्ये पटना ते दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी गाड्या असतील.
तसेच, पटना-गया मार्गावर एक फास्ट पॅसेंजर ट्रेन चालवली जाणार असून यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. या नव्या गाड्यांमध्ये सर्वात खास ट्रेन म्हणजे पटना ते नवी दिल्लीदरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस असेल. ही ट्रेन 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होईल.
पटना ते दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद या मार्गांवर तिकीट कन्फर्म करणे अनेकदा कठीण होते, विशेषतः सणासुदीच्या काळात. त्यामुळे नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. रेल्वेने गाड्यांच्या वेग वाढवण्याबरोबरच पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पूर्व-मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांचा विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. तसेच, पटना-गया आणि पटना-डीडीयू मार्गावर गाड्यांचा सरासरी वेग वाढवण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नवीन गाड्यांसाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्यांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे येत्या काही महिन्यांत पटना ते दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद या मार्गांवर या नवीन गाड्या धावू लागतील. बिहारच्या प्रवाशांसाठी ही मोठी सुविधा असणार आहे, विशेषतः स्लीपर वंदे भारत एक्सप्रेससारख्या आधुनिक गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला अधिक आरामदायक आणि सोयीस्कर बनवतील.
बिहारमधून दिल्ली, पुणे, बेंगळुरू किंवा हैदराबादला प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी निश्चितच आनंददायक ठरणार आहे. नक्कीच पटना ते पुणे दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली तर ही बातमी या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक ठरणार आहे.