Vastu Shastra Tips : वास्तुशास्त्रात घरात कोणती वस्तू कुठे असली पाहिजे याबाबत माहिती देण्यात आली आहे. जर वास्तुशास्त्रानुसार घर बांधले गेले नाही तर अशा कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहतो असे म्हणतात यामुळे घर बांधताना वास्तुशास्त्रानुसारच बांधले पाहिजे असा सल्ला वास्तुशास्त्रातील जाणकार लोक देतात.
वास्तुशास्त्रात घरात आरसा आणि घड्याळ नेमक्या कोणत्या दिशेला असले पाहिजे याबाबत देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात घड्याळ आणि आरसा असतोच. मात्र हेच घड्याळ आणि आरसा योग्य ठिकाणी असणे आवश्यक असते.

जर घड्याळ आणि आरसा चुकीच्या दिशेला लावला गेला तर यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. दरम्यान आता आपण घड्याळ आणि आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा या संदर्भात वास्तुशास्त्रात काय नियम आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्राचे नियम काय सांगतात?
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, आरसा कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवा. या दिशेला आरसा लावणे शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रातील तज्ञ लोक सांगतात की, उत्तर ही कुबेराची दिशा आहे. या दिशेला आरसा असल्यास घरात शांतता प्रस्थापित होते.
तसेच आर्थिक मार्ग खुले होतात. आरसा हा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असायला हवा जर हाच आरसा दक्षिण, पश्चिम, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य दिशेस असेल तरनुकसान होण्याची शक्यता असते.
जर तुमच्याही घरात या दिशेला आरसा असेल तर तात्काळ तो काढून घ्या. कारण या दिशा आरशासाठी योग्य नाहीत. आरसा या दिशेला असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते अन या वास्तुदोषामुळे आर्थिक स्थितीही खराब होते.
तसेच, घड्याळ सुद्धा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असायला हवे. घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये. कारण ही यमाची दिशा आहे. या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण आणि आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहायला मिळतं. जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते काढा आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा.