तुळशी वृंदावन आणि मनी प्लांट कोणत्या दिशेला असावे ? शास्त्र काय सांगत

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना संपत्तीचे आणि सुख-समृद्धीचे तसेच यशाचे प्रतीक मानले गेले आहे. अशी झाडे आपल्या घरात लावली तर यामुळे घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी फिरत असते आणि याचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो.

Tejas B Shelar
Published:
Vastu Tips 2025

Vastu Tips 2025 : वास्तुशास्त्र हे मानवाच्या जीवनावर परिणाम करत असते, वास्तुशास्त्रात घराची आखणी कशी असावी? कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवली पाहिजे, घरात कोणत्या वस्तू हव्यात याबाबत सर्वच माहिती दिलेली आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुळशी वृंदावन आणि मनी प्लांट बाबतही मोठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना संपत्तीचे आणि सुख-समृद्धीचे तसेच यशाचे प्रतीक मानले गेले आहे. अशी झाडे आपल्या घरात लावली तर यामुळे घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी फिरत असते आणि याचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो.

या झाडांमुळे घरातील सर्व सदस्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतो आणि कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. मंडळी तुळस आणि मनी प्लांट हे देखील असेच झाड आहेत जे संपत्तीचे आणि सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

ही झाडे घरात लावल्यास घरात नेहमीच सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. या झाडांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते जी आपल्याला आनंदि ठेवते. खरे तर हिंदू सनातन धर्मात तुळसला फार महत्त्व आहे.

कोणत्याही हिंदू घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, हिंदू घरात तुम्हाला इंट्री केल्याबरोबर तुळशी वृंदावन नजरेस पडेल. पण हे तुळशी वृंदावन नेमके कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे याबाबत वास्तुशास्त्रात काय म्हटले आहे याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.

तसेच, घरात मनी प्लांट ठेवायचे असेल तर ते कोणत्या दिशेला ठेवावे हे देखील समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार, जर तुळस आणि मनी प्लांट ही दोन्ही झाडे एकत्र ठेवली तर त्या घरात आर्थिक तंगी कधीच भासत नाही.

पण, तुळस आणि मनी प्लांट घराच्या ईशान्य दिशेला ठेवले पाहिजे. असे मानले जाते की, जर ही दोन झाडे घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवली तर आर्थिक संकट येत नाही आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही. ही दोन झाडे एकत्र लावणे खूप शुभ मानले जाते.

ईशान्य दिशेला तुळशीचे वृंदावन असेल आणि त्या तुळशीची दररोज पूजा होत असेल तर अशा घरात नेहमीच सुख शांती पाहायला मिळते. अशा घरात माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते आणि या लोकांना पैशांची कधीच कमतरता भासत नाही.

तसेच, घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशाचा ओघही कायम राहतो. जर एखादी व्यक्ती कर्जात असेल तर ती त्यातूनही मुक्त होते. तुळशी आणि मनी प्लांट योग्य दिशेला लावलें तर याचा मोठा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe