Vastu Tips : आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघरासाठी एक जागा असते. प्रत्येकाच्या घरात देव्हारा असतो आणि या देवघरात आपण आपल्या श्रद्धेनुसार विविध देवी-देवतांचे फोटो ठेवतो. विविध देवी-देवतांच्या मुर्त्या देवघरात पाहायला मिळतात. हिंदू सनातन धर्मात मूर्ति पूजेला विशेष महत्त्व आहे.
यामुळे हिंदू सनातन धर्मातील प्रत्येकाची दिवसाची सुरुवात ही देवपूजेनेच होते. दरम्यान आज आपण देवघराबाबत वास्तुशास्त्रातील काही नियम पाहणार आहोत. खरे तर वास्तुशास्त्रात देवघरात कोणत्या देवताचा फोटो ठेवू नये? याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
शास्त्रानुसार, एका देवाचा फोटो देवघरात किंवा घरात ठेवणे वर्ज्य आहे. या देवतेची प्रतिमा घरात ठेवल्यास नकारात्म ऊर्जा येते आणि याचा वाईट परिणाम होतो, असं मानलं जातं.
कोणत्या देवता चा फोटो घरात ठेवू नये?
आपण दररोज सकाळी दिवसाची सुरुवात करण्याअगोदर देवघरात जातो, देवांचे दर्शन घेतो आणि त्यानंतर मग आपल्या दिवसाची सुरुवात होते. आपण आपल्या देवघरात विविध देवी देवतांचे फोटो आणि मूर्ती ठेवलेली असते.
पण वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार देवघरात न्यायदेवता शनि देवाचा फोटो असायला नको. फक्त देवघरातच नाही तर संपूर्ण घरात न्यायदेवता शनि महाराजांचा फोटो लावू नये असे म्हटले जाते.
वास्तुशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात असे म्हटले गेले आहे की, जर तुम्ही नकळत या देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा घरी आणली तर तुमचं नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. या प्रतिमेमुळे अशुभ परिणाम होऊन तुम्हाला व्यवसायात नुकसान होण्याची किंवा तुमची नोकरी जाण्याची भीती आहे.
याशिवाय, तुमचा व्यवसाय ठप्प व्हायला वेळ लागणार नाही. जर शनिदेवताचा फोटो तुमच्या देवघरात असेल तर याच्या प्रभावामुळे तुमच्या कुटुंबातील कलह वाढणार आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतील.
नकारात्मक ऊर्जा तयार होईल. म्हणून घरामध्ये शनि देवाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नये असे शास्त्रात म्हटले गेले आहे. शनि देव प्राण्याचे कर्म पाहून त्यानुसार, त्यांना फळ देणारे मानले जातात. त्यांच्या स्वभाव हा निष्ठूर असतो.
शास्त्रात असे म्हटले गेले आहे की, शनिदेवाला एकदा शाप देण्यात आला होता. शनि देवांना असा शाप देण्यात आला होता की ते ज्याच्याकडे बघतील त्याच्यावर वाईट परिणाम होणार आहे.
यामुळेच घरात आणि देवघरात शनीची मूर्ती ठेवणे निषिद्ध मानले जाते. जे लोक असे करतात, त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात. यामुळे देवघरात न्यायदेवता शनि महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये असे म्हटले जाते.