दिवाळीची खरेदी करताना जरा जपून, ‘या’ वस्तू दिवाळीच्या काळात चुकूनही खरेदी करू नका नाहीतर गरिबी ओढावणार, वास्तुशास्त्र काय सांगत ?

दिवाळीच्या काळात काही वस्तूंची चुकूनही खरेदी करायला नको असे जाणकारांचे म्हणणे आहे. दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वसुबारसाच्या दुसऱ्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण नवीन वस्तू खरेदी करतात. मात्र या दिवशी काही वस्तू चुकूनही खरेदी करू नये अन्यथा कुटुंबात गरिबी येऊ शकते असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.

Published on -

Vastu Tips : जर तुमचाही वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी देशात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतय.

खरंतर दिवाळी हा उत्साहाचा अन आनंदाचा सण आहे. या काळात हिंदू धर्मातील लोक नवीन कपडे, दागिने, कार, घर खरेदी करत असतात. अनेक जण दिवाळीच्या काळात नवीन व्यवसाय देखील सुरू करतात.

काहीजण दिवाळीचे औचित्य साधून शुभप्रसंगी गुंतवणुकीचा प्लॅन तयार करतात. मात्र दिवाळीच्या काळात खरेदी करताना विशेष सांभाळून खरेदी करायला हवी असा सल्ला वास्तुशास्त्राचा जाणकारांनी दिला आहे. दिवाळीच्या काळात काही वस्तूंची चुकूनही खरेदी करायला नको असे जाणकारांचे म्हणणे आहे.

दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वसुबारसाच्या दुसऱ्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण नवीन वस्तू खरेदी करतात. मात्र या दिवशी काही वस्तू चुकूनही खरेदी करू नये अन्यथा कुटुंबात गरिबी येऊ शकते असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.

अशा परिस्थितीत आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे आणि कोणत्या अशा वस्तू आहेत ज्यांची खरेदी करू नये याबाबत वास्तुशास्त्रात नेमके काय म्हटले गेले आहे ? याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

दिवाळीच्या काळात कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या खरेदी करू नयेत 

वास्तुशास्त्रात असे म्हटले गेले आहे की, धनत्रयोदशी-दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी सुख-समृद्धी आणणाऱ्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. या काळात नकारात्मकता वाढेल अशा गोष्टी खरेदी करणे टाळले पाहिजे.

ज्या गोष्टी सकारात्मकता वाढवतात जसे की सोने, चांदी, कपडे, भांडी, नवीन घर, कार, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. वस्तू या काळात खरेदी केल्या जाऊ शकतात. मात्र ज्या वस्तूंच्या खरेदीमुळे नकारात्मकता वाढू शकते अशा वस्तू या काळात खरेदी करू नये अन्यथा घरात गरिबी येऊ शकते.

त्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते. वास्तुशास्त्र असे म्हणते की धनत्रयोदशीला तसेच दिवाळीच्या काळात काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नये. दिवाळीच्या काळात विशेषता धनत्रयोदशीला काळ्या किंवा गडद रंगाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो.

एवढेच नाही तर या काळात जुन्या वस्तू खरेदी करणे देखील टाळावे. या काळात घरात जुन्या वापरलेल्या वस्तू जसे की फर्निचर व इतर आवश्यक वस्तू आणू नये. या काळात जर घरात जुन्या वस्तू आणल्या तर घरातील बरकत निघून जाते असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.

तसेच दिवाळीच्या शुभप्रसंगी घरामध्ये चाकू, कात्री किंवा कोणत्याही धारदार हत्यारासारख्या वस्तू आणू नये. नाहीतर वर्षभर घरात भांडणं होत राहतील अन नात्यात मतभेद निर्माण होतील, असे वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News