Vastu Tips : तुम्ही वास्तुशास्त्राला मानता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर वास्तुशास्त्रात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. घर कसं असलं पाहिजे, घरात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नसल्या पाहिजेत? यांसारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टी वास्तुशास्त्रात नमूद आहेत. जर वास्तुशास्त्रात नमूद असणाऱ्या गोष्टी फॉलो केल्यात तर आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतात.
वास्तुशास्त्रात पर्स मध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे. अनेकदा असे दिसून येते की, काही महिला आणि पुरुष सुद्धा आपल्या पर्समध्ये पैशांशिवाय इतरही अनेक गोष्टी ठेवतात अन पर्स कुठेही घेऊन जातात.

आपल्या पर्समध्ये आपण पैशांव्यतिरिक्त अशा अनेक वस्तू ठेवत असतो ज्याची आपल्याला अजिबात गरज नसते. वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू पर्समध्ये ठेवणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. दरम्यान आता आपण वास्तुशास्त्रानुसार पर्स मध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ असते याबाबत माहिती पाहूयात.
या गोष्टी चुकूनही पर्समध्ये ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चाकू, पिन आणि धातूने बनवलेल्या वस्तू अजिबात ठेवू नयेत. अशा वस्तू पर्समध्ये ठेवल्यास माता लक्ष्मी कोपते आणि यामुळे पर्स मध्ये पैसा टिकत नाही. गरिबी येण्याची शक्यता असते.
अनेक लोक आपल्या पर्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणाची खरेदीची बिले, वेगवेगळी रिसीट बाळगत असतात. मात्र असे करणे सपशेल चुकीचे आहे. असे केल्यास व्यक्तीला राहू दोष लागतो आणि यामुळे धनहानी होण्याची देखील शक्यता असते.
पर्समध्ये पैसे सोडून इतर अनेक गोष्टी ठेवण्याची सवय आपल्याला जडलेली आहे. मात्र पैसे सोडून इतर कोणतीच गोष्ट पर्समध्ये ठेवू नये. काही लोक तर पर्समध्ये तंबाखू आणि गुटखा सुद्धा ठेवतात. पण असे करणे साफ चुकीचे आहे यामुळे तुमच्यावर मोठ आर्थिक संकट येऊ शकत अन तुम्ही कर्जबाजारी सुद्धा होऊ शकतात.
अनेकांच्या पर्समध्ये त्यांच्या पूर्वजांचे आणि देवी देवतांचे फोटो पाहायला मिळतात. मात्र पर्समध्ये आपल्या पूर्वजांचे किंवा देवी देवतांचे फोटो ठेवू नये असे वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. जर कोणी तसं करत असेल तर या फोटोची विटंबना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाटलेली पर्स चुकूनही सोबत बाळगू नये. पर्स कोणतीही असली तरी काही हरकत नसते, पण ती फाटलेली राहणार नाही याची काळजी घ्यावी. पर्स फाटल्यास ताबडतोब चेंज करून घेणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रात असे नमूद करण्यात आले आहे की पर्समध्ये अशी चित्रे ठेवू नका ज्यामध्ये राग, मत्सर, विरोध या भावना दिसतील. असे केल्यास निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते.
काही लोक आपल्या पर्समध्ये चावी ठेवत असतात जे की वास्तु शास्त्रानुसार योग्य नसते. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये चावी ठेवत असाल तर तुम्हाला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागू शकते.