नवीन घरात प्रवेश करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या ! या 5 गोष्टींची काळजी घेतल्यास घरात श्रीमंती येणार

नवीन घरात प्रवेश करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्राने नवीन घरात प्रवेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात प्रवेश करण्याआधी सर्वप्रथम त्या घराची शांती करणे म्हणजेच वास्तुशांती पूजा करणे आवश्यक आहे. वास्तुशांती किंवा गृहप्रवेश पूजा, सत्यनारायण पूजा केल्याशिवाय नव्या घरात प्रवेश करू नये असे म्हटले जाते.

Tejas B Shelar
Published:

Vastu Tips : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल नाही का? घर खरेदीसाठी आपण आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च करत असतो. तारुण्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे घर खरेदी करणे. घर बनवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे.

पण नवीन घरात प्रवेश करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्राने नवीन घरात प्रवेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात प्रवेश करण्याआधी सर्वप्रथम त्या घराची शांती करणे म्हणजेच वास्तुशांती पूजा करणे आवश्यक आहे.

वास्तुशांती किंवा गृहप्रवेश पूजा, सत्यनारायण पूजा केल्याशिवाय नव्या घरात प्रवेश करू नये असे म्हटले जाते. घरातील वाईट व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी ही पूजा केली जाते.

नवीन घरात प्रवेश करताना या गोष्टींची काळजी घ्या

नवीन घरात प्रवेश करण्याआधी शुभ महिना, तारीख व दिवस तपासून वास्तुशांती पूजा केली पाहिजे. नवीन घरात प्रवेश करताना विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. वास्तुपूजनाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे.

घरात प्रवेश करताना नेहमी उजवा पाय प्रथम ठेवावा. रात्री गृहपूजा झाल्यानंतर सर्व सदस्यांनी तेथेच झोपावे. तसेच वास्तूची पूजा केल्यानंतर घराच्या मालकाने संपूर्ण इमारतीत फेरफटका मारला पाहिजे.

घरातील स्त्रीने पाण्याने भरलेला कलश घ्यावा. मग घरभर फिरावे. तसेच घरात सर्वत्र फुले लावा. गृहप्रवेश पूजेच्या दिवशी पाण्याने किंवा दुधाने भरलेला कलश घरात ठेवावा. त्यानंतर तो कलश दुसऱ्या दिवशी मंदिरात अर्पण करावा.

घरात प्रवेश करण्याच्या दिवशी दूध उकळले पाहिजे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

घरात प्रवेश केल्यानंतर घर ४० दिवस घर एकटे सोडू नये, असे वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. नव्या घरात घरातील किमान एक सदस्य ४० दिवस राहिला पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe