Vastu Tips : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्राला देखील आपल्याकडे फारच महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात अशा असंख्य गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्याचा अवलंब केल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. वास्तुशास्त्रात जे नियम सांगितले गेले आहेत त्या नियमांचे जर पालन झाले तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते.
असं म्हणतात की वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ठेवल्या जाणाऱ्या पायपुसणीच्या बाबत सुद्धा काही विशिष्ट नियम आहेत. दरम्यान आज आपण वास्तुशास्त्रात पायपुसणीच्या संदर्भात नेमके काय नियम सांगितले गेले आहेत? आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ कोणत्या रंगाचे पाय पुसणे असायला हवे याबाबत आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पायपुसणे फक्त पाय पुसण्याचे साधन नाही
खरे तर, अलिकडे बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या आपल्याला पाहायला मिळतात. बाजारात रंगबिरंगी पायपुसणी असतात आणि आपल्यापैकी अनेकजण दररोज वेगवेगळ्या रंगाच्या पाय पुसण्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाकत असतात.
असं म्हणतात की, घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवली जाणारी पायपुसणी ही घरावर सुद्धा प्रभाव टाकत असते. पायपुसणी फक्त आपल्या पायावरील धूळ-घाण बाहेर राहावी यासाठी नाहीये, तर पायपुसणी हे सौख्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतिक अन प्रवेशद्वार सुद्धा मानले जाते.
वास्तविक, आपल्याकडे प्राचीन काळी अंगणात पाय धुण्याची पद्धत होती, आजही काही ठिकाणी ही पद्धत जोपासली जाते. मात्र बहुतांशी घरांमध्ये ही पद्धत काळात झाली आहे. शहरात तर ही पद्धत गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच काळाआड झाली आहे.
सध्याच्या आधुनिकीकरणाच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या काळात पायपुसणीचा पर्याय पुढे आला आहे. पण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायपुसणी ठेवताना तिच्या रंगाची विशेष काळजी घ्यायला हवी.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणत्या रंगाची पायपुसणी हवी?
वास्तुशास्त्र असं सांगत की, घराच्या दरवाजाजवळ फिकट हिरव्या रंगाची पायपुसणी ठेवायाला हवी. या रंगाची पाय पुसणी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील लोक अधिक उत्साही आणि प्रसन्न राहतात. पण जर गडद किंवा काळ्या रंगाचे पायपुसणी ठेवली तर याचा घरातील सदस्यांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम पाहायला मिळतो.
यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी येथे आणि आत्मविश्वासात कमतरता जाणवू लागते. दरम्यान वास्तु तज्ञ असेही सांगतात की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ असणारी पायपुसणी स्वच्छ असायला हवी आणि वेळोवेळी बदलली सुद्धा गेली पाहिजे.
पायपुसणीखाली तुरटी ठेवावी
वास्तुशास्त्रात असे सांगितले गेले आहे की, घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी ठेवल्या गेलेल्या पायपुसण्याखाली तुरटी ठेवावी. असे केल्यास घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते. जर कुटुंबात वेळोवेळी वाद-विवाद होत असतील आणि तुम्हाला शांतता हवी असेल तर कापराच्या वड्या कपड्यात गुंडाळून पायपुसणीखाली ठेवाव्यात.
तुम्ही जर हे उपाय केलेत तर या उपायांनी घरात मानसिक आणि आर्थिक समृद्धी टिकते असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे. शिवाय, घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा तुटलेला नको. तो सुस्थितीत ठेवून त्याच्या पुढे आयताकृती पायपुसणे ठेवावे. म्हणजेच दरवाजाजवळ पाय पुसणे हे आयताकृती असायला हवे.