Vastu Tips : घरात गोलाकार घड्याळ लावावे की चौकोनी ? वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांनी स्पष्टचं सांगितल

Published on -

Vastu Tips : तुम्ही पण नवीन घर बांधले असेल आणि नवं घर तुम्हाला आता व्यवस्थित सेट करायचे असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर घराची बांधणी आणि त्याची मांडणी वास्तुशास्त्रानुसार असणे आवश्यक असल्याचा दावा केला जातो.

शास्त्रानुसार घर बांधलेले असले तर अशा घरांमध्ये शांती लाभते. त्यामुळे घरातील सदस्यांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो आणि आयुष्यात चांगले यश मिळते. घरातील ऊर्जा संतुलन आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रातील छोट्या-मोठ्या गोष्टींचे महत्त्व खूप आहे.

दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये घरात घड्याळ कोणत्या दिशेला पाहिजे ते घड्याळ कसे पाहिजे? याबाबत काही नियम आहेत. तसेच आपल्याकडे घड्याळाबाबत काही अलिखित आणि प्रचलित प्रथा तसेच नियम सुद्धा आहेत.

दरम्यान आज आपण घरात घड्याळ लावण्याबाबत वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं गेलं याबाबतची माहिती येथे पाहणार आहोत. घरांमध्ये सजावटीसाठी, वेळ पाहण्यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घड्याळ लावले जाते. पण घरात गोलाकार घड्याळ लावावे की चौकोनी? चला वास्तुशास्त्रात याबाबत काय म्हटलं गेलंय ते जाणून घेऊया.

वास्तुशास्त्र काय सांगते?

वास्तुशास्त्रानुसार घड्याळाची दिशा, स्थिती आणि आकार हे सकारात्मक उर्जेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे घड्याळ पूर्णपणे कार्यरत असावे, कारण न काम करणारे वा बंद घड्याळ जीवनात अडथळा, विलंब व नकारात्मकता सूचित करू शकते. 

आकाराबद्दल तज्ज्ञांचे मत हे साधारणपणे असे आहे की, गोलाकार घड्याळ ही सर्वाधिक शुभ व ऊर्जा संतुलन राखणारी आकृती मानली जाते. आकाराने गोलाकार घड्याळ वेळेचा अखंड प्रवाह दाखवतो आणि घरात ऊर्जा सहज व सुलभपणे फिरू देतो, ज्यामुळे समाधान, शांती व आनंद वाढतो.

दुसरीकडे, चौकोनी (स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर) घड्याळे देखील वापरता येतात, पण त्यांच्याशी काही नियम जोडलेले आहेत. चौकोनी आकार धीट व सरळ उर्जा प्रवाहाचे प्रतीक मानला जातो, ज्यामुळे संरचना किंवा नियोजनाची भावना वाढते, विशेषतः कार्यालये, अभ्यासखोली किंवा कामाच्या जागेत.

परंतु या आकाराच्या घड्याळांना तीक्ष्ण किंवा काटेरी आकृती नसावी, कारण वेगवेगळ्या कोपऱ्यांमुळे उर्जा प्रवाहात तणाव निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे घरात घड्याळ उत्तरेकडे, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे लावणे अधिक शुभ मानले जाते. यामुळे धन, स्वास्थ्य व मैत्रीपूर्ण वातावरणाची संधी वाढते.

दक्षिणेकडे घड्याळ लावणे उत्साह आणि समृद्धीला अड़थळा आणण्यास कारणीभूत ठरू शकते, असा विश्वास आहे.  म्हणूनच, जर तुमचा मुख्य उद्देश घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि संतुलन आणणे असेल, तर गोलाकार घड्याळ प्राधान्याने वापरा. आणि जिथे अधिक तटस्थ, सुव्यवस्थित व कार्यक्षम उर्जा हवी असेल तिथे चौकोनी घड्याळाचा विचार करायला हरकत नाही. या वास्तु टिप्सचा योग्य वापर केल्यास घराच्या वातावरणात सुख-समृद्धी वाढण्यास मदत होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News