अबब ! ह्या 39 मजली इमारतीत तब्बल 30,000 लोक राहतात, कुठं आहे ‘ही’ इमारत, महिन्याचे भाडे किती आहे ?

जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यावर सर्वसामान्य माणसांना विश्वास ठेवणे अशक्य होते. दरम्यान आज आपण जगातील अशा एका इमारतीची माहिती पाहणार आहोत जिथे शेकडो अपार्टमेंट आहेत आणि या बिल्डिंगमध्ये तब्बल 30,000 लोक राहतात.

Published on -

Viral News : जगात अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण, या गोष्टी खऱ्या असतात आणि यामुळे लोकांचे लक्ष अशा गोष्टींकडे अधिक वेधले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये जगाने विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. स्थापत्य क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही. जगात अशा कित्येक वास्तू बांधल्या गेल्या आहेत ज्या की स्थापत्यशास्त्राच्या विकासाचे प्रतीक बनल्या आहेत.

दरम्यान आज आपण जगातील अशा एका इमारतीची माहिती पाहणार आहोत जिथे तब्बल तीस हजार लोक वास्तव्याला आहेत. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण जगात अशी इमारत आहे. अशा स्थितीत आता आपण ही इमारत नेमकी कुठे आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.

 कुठे आहे ही इमारत 

आम्ही ज्या इमारती बाबत बोलत आहोत ती 39 मजली इमारत चीनमध्ये बांधण्यात आली आहे. खरे तर भारताप्रमाणे चीनमध्येही प्रचंड मोठी लोकसंख्या आहे. भारतातील चीन हाच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता.

यामुळे भारताप्रमाणेच चीनमध्येही लोकसंख्येचे घनता अधिक आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये चीनने मोठी प्रगती साधली आहे. चीन आता विकसित देशांच्या पंगतीत आहे. कधीकाळी भारताची आणि चीनची स्थिती सारखीच होती मात्र चीन सध्या स्थितीला तरी भारताच्या फार पुढे आहे.

चीनमध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. चीनमधील हांगझोऊ येथील कियानजियांग सेंच्युरी शहरात देखील अशीच एक अद्भुत इमारत आहे ज्यात तब्बल 30000 लोक राहतात. ही एक एस पॅटर्नची इमारत आहे.

ही इमारत 36 मजली आहे. येथे तीस हजार लोक एकत्रित राहतात. या इमारतीचे उद्घाटन 2013 मध्ये झाले होते आणि त्यावेळी या इमारतीत 20000 लोक राहत होते. मात्र या बारा वर्षांच्या काळात या इमारतीतील लोकसंख्या 30000 वर पोचली आहे. या इमारतीचे नाव रीजेंट इंटरनॅशनल अपार्टमेंट्स असे आहे आणि ही इमारत पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे भेट देतात.

जी लोक चायनाला जातात ती लोक स्थापत्यकलेचा हा अद्भुत नमुना पाहण्यासाठी इथे आवर्जून भेट देतात. खरे तर या इमारतीची उंची 675 फुट इतकी आहे. या इमारतीत सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. इथे एक मोठे फूड कोर्ट, स्विमिंग पूल, किराणा दुकान, नाईचे दुकान, नेल सलून आणि कॅफे देखील आहे. 

भाडे किती आहे ? 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या इमारतीत जर राहायचे असेल तर किती खर्च येईल. तर अहवालात असे सांगितले गेले आहे की, येथील एका लहान खिडकीविरहित अपार्टमेंटचे भाडे भारतीय चलनात 17 हजार रुपये इतके आहे. तसेच बाल्कनी आणि मोकळी जागा असलेल्या मोठ्या फ्लॅटसाठी नागरिकांना भारतीय चलनात जवळपास 45 हजार रुपयांपर्यंतचे भाडे द्यावे लागू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!