Viral News : भारतातील बहुसंख्य लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे देशात हिंदू लोकांची प्रार्थना स्थळे अर्थात मंदिरांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. म्हणूनच भारताला मंदिरांचा देश म्हणूनही ओळखतात.
आपल्याला गावांमध्ये हिंदू धर्मियांची मंदिरे पाहायला मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील प्रत्येक मंदिराच्या बांधणी मागे एक मोठा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराचे स्वतःची एक वेगळी परंपरा इतिहास रूढी नियम आणि धार्मिक मान्यता मात्र असतात.

जसे की अहिल्यानगर मधील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनि देवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश बंदी आहे. शबरीमाला मंदिरात सुद्धा महिलांना प्रवेश बंदी आहे. दरम्यान आज आपण देशातील अशा पाच मंदिरांची माहिती पाहणार आहोत याबाबत तुम्ही कदाचित या आधी कधीही ऐकले नसेल.
आज आपण देशातील अशा पाच मंदिरांची माहिती पाहणार आहोत जिथे गेल्यानंतर भाविकांना प्रसाद ग्रहण करता येत नाही. असं म्हटलं जातं की या मंदिरांमधील प्रसाद ग्रहण करणे मानवासाठी अशुभ आहे.
नक्कीच आता तुम्हाला या मंदिरांबाबत माहिती जाणून घ्यायची असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया अशी कोणती मंदिरे आहेत जिथे भाविकांना प्रसाद ग्रहण करता येत नाही. खरंतर आपण कोणत्याही मंदिरात गेलो की पूजा अर्चना झाल्यानंतर देवाचा प्रसाद ग्रहण करतो.
देवाच्या प्रसादाला फारच महत्त्व असते. ओडिषा राज्यातील श्रीक्षेत्र पुरी येथील प्रभू भगवान जगन्नाथ यांच्या प्रसादाला फार महत्व आहे. असं म्हणतात की, पुरीला गेल्यानंतर भगवान जगन्नाथजींचा प्रसाद खाल्ला नाही तर दर्शनाचे कोणतेच फळ भाविकाला मिळत नाही. पण देशात असेही काही मंदिर आहे जिथे भाविकांना प्रसाद ग्रहण करता येत नाही.
या मंदिरात चुकूनही प्रसाद खाऊ नये
मेहंदीपूर बालाजी मंदिर : राजस्थानातील मेहंदीपूर बालाजी मंदिर हे भूतबाधा, नकारात्मक शक्ती आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते, या श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे. येथे होणाऱ्या धार्मिक विधी अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे असतात. या मंदिरात अर्पण केला जाणारा प्रसाद केवळ देवाला समर्पित असतो. भाविकांना तो खाणे किंवा घरी नेणे सक्त मनाई आहे. हा प्रसाद धार्मिक विधींचा भाग मानला जातो आणि मानवी सेवनासाठी नसतो, अशी ठाम श्रद्धा आहे.
आसाममधील कामाख्या देवी मंदिर : हे मंदिर तांत्रिक परंपरांसाठी ओळखले जाते. दरवर्षी अंबुबाची मेळ्याच्या काळात देवीचा ऋतुकाळ मानला जातो. या दिवसांत मंदिर काही काळासाठी बंद ठेवले जाते आणि प्रसाद ग्रहण करणे पूर्णतः वर्ज्य मानले जाते. या काळात धार्मिक विधींवरही मर्यादा असतात, ज्यामुळे या मंदिराची रहस्यमय ओळख अधिकच ठळक होते.
मध्यप्रदेशातील उज्जैन येथील काल भैरव मंदिर : हे मंदिर संपूर्ण भारतात आपल्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथे भगवान काल भैरवांना मद्य अर्पण केले जाते. हे मद्यप्रसाद कोणालाही घेता येत नाही किंवा घरी नेता येत नाही. हा प्रसाद केवळ देवासाठीच असल्याचे मानले जाते.
हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिर हे ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. येथे देवीला अर्पण केलेला प्रसाद मंदिर परिसरातच ग्रहण करावा लागतो. श्रद्धेनुसार, हा प्रसाद घरी नेल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात, अशी समजूत आहे.
कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिर : हे पवित्र मंदिर एक कोटी शिवलिंगांसाठी ओळखले जाते. येथे मिळणारा प्रसाद केवळ प्रतीकात्मक मानला जातो. शिवलिंगावर अर्पण झालेला प्रसाद चंडेश्वरांना समर्पित असतो आणि तो मानवाने ग्रहण करणे अशुभ मानले जाते.













