Viral Video : सोशल मीडियाचा वापर अलीकडे फारच वाढला आहे. विशेषतः युट्युब, इंस्टाग्राम यांसारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा अलीकडे सर्वाधिक वापर होत असून यावर आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओज व्हायरल होतात.
विनोदी, नृत्याचे, संगीताचे तसेच माहितीपर व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सासू आणि सून दोघेही डान्स फ्लोर काबीज करून प्रचंड जोशाने आनंद साजरा करताना दिसत आहेत.

यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या माध्यमातून भन्नाट प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून यामध्ये नववधू आपल्या सासु समवेत जोरदार डान्स करताना दिसत आहे.
यामुळे अनेकांनी सासू-सुनेच्या या जुगलबंदीला दाद दिली आहे आणि त्यांच्यावर अक्षरशः कौतुकांचा वर्षाव केला आहे. सासु सुनेच्या जबरदस्त डान्सिंगचा हा व्हिडिओ हळदी समारंभाचा आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की नवरा मुलगा आणि नवरी दोघेही पाहुणेमंडळी डान्स करत असताना तिथे नाचायला जातात.
ते दोघेही सोबत पाहुणे मंडळी समवेत नाचतात आणि तितक्यात तिथे नवरदेवाचे आई नाचायला येते आणि ते आपल्या सुनेसोबत प्रचंड उत्साहाने नाचते. हलगीच्या ठेक्यावर सासु सुनेची जोडी धमाल मज्जा करताना दिसत आहे. सासु सुनेच्या भन्नाट डान्स चा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरील divya___3128 या अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारोंच्या संख्येने लाईक झाले आहेत आणि हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. तसेच शेकडोच्यावर लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या instagram च्या फीड मध्ये हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.
महत्त्वाचे म्हणजे नेटकऱ्यांना सासु सुनेची ही जुगलबंदी फारच आवडलेली आहे. खरे तर, तुम्ही असंख्य डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील, मात्र या जोडीने जो डान्स केला आहे तो फारच कौतुकास्पद असून अगदीच मराठमोळ्या शैलीत या जोडीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या माध्यमातून अनेक मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत.
या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये एका युजरने मस्तच डान्स केला अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ”आता डान्स नंतर जोरदार हाणामारी” अशी मजेशीर कमेंट केली असून या कमेंटला देखील अनेकांनी लाईक केलेले आहे. तसेच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने ”जेव्हा सासूला सून लय आवडते तेव्हा असा डान्स होतो” अशी प्रतिक्रिया देत या व्हिडिओची प्रशंसा केलेली आहे.