Viral Video : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. व्हाट्सअप, youtube, instagram यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक डान्सचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात. दरम्यान, सध्या महाराष्ट्राला अशाच एका डान्सच्या व्हिडिओने वेड लावले आहे.
instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एका डान्सचा व्हिडिओ जबरदस्त गाजतोय. यामध्ये एक काकू संजू राठोड यांच्या एका नव्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. प्रसिद्ध गायक संजू राठोडने अलीकडेच एक नवं गाणं रिलीज केले आहे. एक नंबर, तुझी कंबर…असे हे नवं गाण असून या नव्या गाण्यावर एका काकूंनी तुफान डान्स केला आहे.

दरम्यान हा डान्सचा व्हिडिओ instagram वर अपलोड करण्यात आला असून या व्हिडिओ वरून सध्या नेटकऱ्यांच्या नजराच हटेनात. शिवाय या डान्स व्हिडिओमध्ये काकूंची अदा, स्टाइल आणि जबरदस्त एनर्जीने सर्वजन हैरान झाले आहेत. दरम्यान या व्हिडिओमुळे बिनधास्त डान्स करणाऱ्या काकू रातोरात सोशल मीडियावर स्टार झाल्या असून अनेक लोकांनी त्यांना फॉलो केले आहे.
मंडळी, गुलाबी साडी, काळी बिंदी अशा अनेक गाण्यांमुळे तरुणाईला वेड लावणारे लोकप्रिय गायक संजू राठोड यांच एक नवीन गाणं म्हणजेच एक नंबर, तुझी कंबर हे गाण सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळतोय. बऱ्याच लोकांनी या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ बनवला आहे आणि सोशल मीडियावर अपलोड केलाय.
पण या असंख्य व्हिडिओजमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते एका स्टायलिश काकूंच्या डान्स परफॉर्मन्सने. shilpaprabhukar या instagram अकाउंट वर हा डान्सचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून यातील डान्स स्टेप्स, कॉन्फिडन्स आणि चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकरी अगदीच घायाळ झाले आहेत.
अनेक लोक या गाण्यावरील डान्सचा हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. आतापर्यंत इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून यातील हजारो लोकांनी हा डान्स व्हिडिओ लाईक केला आहे. तसेच अनेकांच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला जातोय.
यावर अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. अनेकांनी काकूंच्या या डान्स परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने एक नंबर अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या एका युजरने एनर्जीचा पाऊस असं म्हणत व्हिडिओला दाद दिलेली आहे. आतापर्यंत या व्हिडिओवर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
या instagram प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या घरातच संजू राठोडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या महिलेने पोपट्या रंगाची साडी परिधान केलेली असून डोळ्यांना गॉगल सुद्धा लावलेला आहे. तसेच या काकूंनी या गाण्यावर जबरदस्त असा डान्स परफॉर्मन्स देऊन सोशल मीडियावरील नेटकरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.