सरकार नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना देणार 25 हजार रुपयांचे अनुदान ! राज्य शासनाकडून कन्यादान योजनेची सुरुवात

Vivah Anudan : तुळशी विवाह संपन्न झाल्यापासून लग्नाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. दरम्यान आज आपण नवविवाहित जोडप्यांसाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कन्यादान योजना राबवली जात आहे.

अशा स्थितीत आज आपण ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा कोणाला फायदा मिळतो, या योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करावा लागतो अशा सगळ्या गोष्टी या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कशी आहे राज्य शासनाची नवी योजना ?

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. ज्या योजनेतूनही मदत पुरवली जात आहे त्याला कन्यादान योजना म्हणून ओळखले जाते.

या योजनेअंतर्गत राज्यातील मागास प्रवर्गातील नागरिकांना लाभ दिला जातो. राज्यातील SC म्हणजे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच OBC म्हणजे विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना यातून लाभ मिळतो.

या सदर कॅटेगिरी मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील जोडप्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जात आहे. पण याचा लाभ फक्त सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना दिला जातो.

या अंतर्गत नवविवाहित सोडताना 25000 रुपयांचे अनुदान मिळते. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून ज्या संस्था सामूहिक विवाहचे आयोजन करतात त्यांना प्रतिजोडपे 4000 रुपये असे अनुदान दिले जाते.

या योजनेच्या माध्यमातून ज्या दिवशी लग्न असते त्या दिवशी वधूच्या आई-वडिलांना 25000 रुपयांचा चेक दिला जातो. याचा लाभ फक्त पहिल्यांदा लग्न करणाऱ्यांना मिळतो तसेच महिला विवाहित असल्यास देखील याचा लाभ मिळू शकतो.

या योजनेचा लाभ फक्त अशाच जोडप्यांना मिळतो ज्यातील एक व्यक्ती म्हणजे नवरा किंवा बायको अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असतात. 

अर्ज कसा आणि कुठे करावा

कन्यादान योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज हा विहित नमुन्यातील अर्ज भरूनच सादर करावा लागतो. जिल्हा समाज कल्याण कार्यालयात या योजनेच्या विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध होतो. संबंधित कार्यालयात भेट दिल्यानंतर इच्छुक आणि पात्र अर्जदारांना विहित नमुन्यातील अर्जाची हार्ड कॉपी घेऊन योग्य ती माहिती सादर करून तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्ज जमा करावा लागतो.