Vivo V60 Launch Date : श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात रक्षाबंधन गणेशोत्सव असे अनेक सण साजरा होणार आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला या सणासुदीच्या हंगामात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी विवोचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कारण की विवो कंपनीने एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Vivo ही एक लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी असून कंपनी येत्या काही दिवसांनी भारतीय बाजारात Vivo V60 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

कंपनीने अधिकृतरित्या या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख सुद्धा जाहीर केली आहे. आता आपण विवो V60 हा स्मार्टफोन नेमका कधी लॉन्च होणार, याचे स्पेसिफिकेशन कसे असणार आणि यात काय-काय फीचर्स मिळणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केव्हा लॉन्च होणार नवा स्मार्टफोन ?
कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, येत्या अकरा दिवसांनी अर्थातच 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजता विवोचा हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या दिवसापासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साइटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
कसा असणार विवोचा नवा स्मार्टफोन?
Vivo V50 ला भारतीय ग्राहकांकडून चांगला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. यामुळे Vivo V60 या नव्या स्मार्टफोनला देखील भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी आशा कंपनीला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ऑस्पिशियस गोल्ड, मूनलिट ब्लू आणि मिस्ट ग्रे या तीन कलर ऑप्शन मध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध राहणार अशी माहिती समोर आलीये. या फोनमध्ये क्वाड कर्व्ह डिस्प्ले दिला जाणार आहे, जो की ग्राहकांना एक वेगळ्याच लेव्हलचा अनुभव देणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 7 जनरल 4 प्रोसेसरने सुसज्ज राहणार आहे.
हा स्मार्टफोन 12 gb पर्यंतच्या रॅमसह 12 जीबी एक्सटेंडर रॅमला सपोर्ट करणार आहे. हा फोन फनटचओएस 15 वर चालणार आहे. या फोनला गुगल जेमिनीचाही सपोर्ट मिळणार आहे. हा फोन हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी सर्वात बेस्ट राहणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कॅमेरा आणि बॅटरी राहणार दमदार
मीडिया रिपोर्ट नुसार या आगामी स्मार्टफोनमध्ये विवोने फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल Zeiss Sony IMX766 मुख्य सेन्सर (1/1.56″, OIS), 50-मेगापिक्सेल Zeiss Sony IMX882 टेलिफोटो लेन्स (1/1.95″, OIS, 10x झूम) आणि 8-मेगापिक्सेल Zeiss अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आले आहेत.
हा स्मार्टफोन फोटोग्राफीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरणार आहे. सेल्फीसाठी, यात 92-डिग्री वाइड-अँगल लेन्ससह 50-मेगापिक्सेल Zeiss फ्रंट कॅमेरा दिला जाणार अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. फोनमध्ये Zeiss मल्टीफोकल पोर्ट्रेट आणि AI फोर-सीझन पोर्ट्रेट सारखे फीचर्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या फोनमध्ये x Wedding vLog फीचर देखील देण्यात आले आहे.
Vivo V60 कंपनीचा हँडसेट जबरदस्त बॅटरी पॅकस येणार आहे. यात 6500mAh ब्लूव्होल्ट बॅटरी देण्यात आली आहे आणि ती 90W फ्लॅशचार्जला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन दीड मीटर खोल पाण्यात दोन तासापर्यंत काम करू शकतो. नक्कीच हा स्मार्टफोन रफ युजसाठी देखील एक बेस्ट पर्याय राहणार आहे. 12 तारखेला हा स्मार्टफोन आता लॉन्च होणार आहे.
किंमत किती राहणार?
या स्मार्टफोनची अधिकृत लॉन्चिंग तारीख जाहीर झाली आहे. 12 जुलै रोजी 12 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. मात्र याची किंमत किती असेल या संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत काय राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.