Vodafone Idea Share Price : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात मंदी दिसून येत आहे. सप्टेंबर 2024 पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण होत आहे. मात्र आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी सेन्सेक्स मध्ये आणि निफ्टी मध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे.
आज BSE सेन्सेक्स 24.23 अंकांनी आणि NSE निफ्टी 12.85 अंकांनी वाढली. या वाढीसह BSE सेन्सेक्स 74626.26 आणि NSE निफ्टी 22560.40 वर पोहोचले. पण, वोडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये आज सुद्धा घसरण झाली आहे.

आज हा पेनी स्टॉक 0.25 टक्क्यांनी घसरला अन सध्या तो 7.89 रुपयांवर ट्रेड करत आहे. दरम्यान आता या स्टॉकबाबत टॉप ब्रोकरेजकडून सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण वोडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेज कडून नेमकी काय रेटिंग देण्यात आली आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
वोडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकची सध्याची स्थिती
स्टॉक एक्सचेंज कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज या कंपनीचा स्टॉक -0.25 टक्क्यांनी घसरला. सध्या तो 7.89 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु सुरू झाल्यानंतर या कंपनीचे स्टॉक 7.99 रुपयांवर होते. हा शेअर 7.99 रुपयांवर ओपन झाला.
मात्र नंतर यामध्ये थोडीशी घसरण झाली. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आज दिवसभरात 8.03 रुपयांचा उच्चांक गाठला होता, अन शेअरचा निच्चांक 7.88 रुपये इतका नमूद करण्यात आला.
तसेचं सध्या हा स्टॉक 7.89 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 19.18 रुपये अन 52 आठवड्यांचा नीचांक 6.61 रुपये इतका आहे. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 56,543 Cr. रुपये इतके आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचा स्टॉक सातत्याने घसरत आहे. मात्र असे असले तरी येत्या काही दिवसांनी या स्टॉक मध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे.
टार्गेट प्राईस काय?
मिळालेल्या माहितीनुसार जेएम फायनान्शिअल सर्विसेसकडून वोडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉक साठी बाय रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. हा स्टॉक सध्याच्या 7.89 रुपयांच्या किमतीपेक्षा 14.07% अपसाईड जाणार म्हणजेच यात 14.07% ची वाढ होणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. यासाठी या ब्रोकरेजकडून 9 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.