Voter ID Card : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान आज नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान पार पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात होती त्या निवडणुकांसाठी जनतेचा कौल आज मत पेट्यांमध्ये बंद होणार आहे.
दरम्यान उद्याची मतमोजणी हायकोर्टाने पुढील काही दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निवडणुकांची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा आहे. खरेतर, आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

त्यामुळे तुमच्याही मतदारसंघात आज मतदान सुरू असेल तर तुम्ही तुमचा हक्क नक्कीच बजावला पाहिजे. दरम्यान ज्या लोकांचे मतदान कार्ड हरवले असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
आज आपण मतदान कार्ड हरवल्यास ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड कसे काढायचे याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC) उपलब्ध करून दिलेले आहे.
हे डिजिटल मतदान कार्ड तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध आहे. हे डिजिटल ओळखपत्र मूळ पीव्हीसी कार्ड इतकेच वैध आहे.
म्हणजेच हे डिजिटल कार्ड डाऊनलोड करून तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता. हे ऑनलाईन कार्ड काही मिनिटांत आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करता येते.
हे डिजिटल मतदार ओळखपत्र पीडीएफ स्वरूपात येते आणि मतदान कार्ड धारकांना याची प्रिंट काढता येऊ शकते. प्रिंट काढल्यानंतर कार्ड धारक ते लॅमिनेट करून मतदानासाठी सहज वापरू शकता. आता आपण हे ऑनलाइन मतदान कार्ड कसे काढायचे हे समजून घेऊयात.
ऑनलाइन मतदान कार्ड काढण्याची सोपी प्रोसेस
तुम्हाला ऑनलाईन मतदान कार्ड काढायचे असेल तर यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ आहेत.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्हाला लॉगिन घ्यावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक म्हणजे मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि आपले राज्य निवडायचे आहे.
मग तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP (वन टाइम पासवर्ड) येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ‘Download e-EPIC’ हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला ह्या ऑनलाईन मतदान कार्डची एक PDF फाईल मिळणार आहे. ही फाईल सेव्ह करून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता.













