……तर मतदान कार्डधारकांना तुरुंगात जावे लागू शकते ! काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम?

ठरा वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळतो मात्र यासाठी मतदान कार्ड जरुरीचे असते. मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येतो. दरम्यान मतदार यादीत नाव नोंदणी केल्यानंतर सदर व्यक्तीचे मतदान कार्ड तयार होते. पण अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की एका व्यक्तीचे दोन मतदान कार्ड असतात. पण एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असणे हा गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये सदर व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई होते.

Tejas B Shelar
Published:
Voter ID Card

Voter ID Card : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पण काल प्रचाराचा झंझावात थांबलाय. आता राजकीय नेत्यांसहित सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे ते मतदानाकडे. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल अन त्यानंतर मग 23 तारखेला मतमोजणी पूर्ण होणार आहे.

खरंतर, मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. मतदान करणे हे आपले साऱ्यांचे कर्तव्यच आहे. आपले राज्य, आपला देश कोणत्या माणसांच्या हातात असावा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला मतदानातून मिळतो. यामुळे आपण सर्वांनीच मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.

जेवढे अधिक प्रमाणात मतदान होईल तेवढाच योग्य माणूस सत्तेवर येईल असं जाणकार नेहमी सांगत असतात. यामुळे तुम्हाला भारतीय संविधानाने दिलेल्या या मतदानाचा वापर अवश्य करावा. पण मतदान करण्यासाठी पात्र नागरिकांकडे मतदान कार्ड आवश्यक असते.

अठरा वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळतो मात्र यासाठी मतदान कार्ड जरुरीचे असते. मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येतो. दरम्यान मतदार यादीत नाव नोंदणी केल्यानंतर सदर व्यक्तीचे मतदान कार्ड तयार होते.

पण अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की एका व्यक्तीचे दोन मतदान कार्ड असतात. पण एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असणे हा गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये सदर व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई होते. भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असणाऱ्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

वेगवेगळ्या ठिकाणाचे दोन मतदान कार्ड असतील तर हा कायद्याने गुन्हा आहे. अशी व्यक्ती आढळल्यास त्याला एका वर्षाची कारावासाची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. एवढेच नाही तर भारतात असेही आढळून आले आहे की काही लोक बनावट मतदान कार्ड बनवतात.

यामुळे ही बनावटगिरी रोखण्यासाठी आता मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची सूचना जारी करण्यात आली आहे. याचे कामही सध्या प्रगतीपथावर असून येत्या काही वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. अनेकांनी आपल्या आधार कार्ड सोबत मतदान कार्ड लिंक केलेले आहे.

मात्र अजूनही काही लोकांचे आधारसोबत मतदान कार्ड लिंक करणे बाकी असून आगामी काळात या बाकी राहिलेल्या लोकांचेही लिंकिंग पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय.

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ज्या लोकांकडे दोन मतदान कार्ड आहेत त्यांनी काय केले पाहिजे? जर तुमच्याकडे दोन मतदान कार्ड असतील आणि तुम्हाला शिक्षा पासून वाचायचे असेल तर तुम्ही एक मतदान कार्ड बंद किंवा रद्द केले पाहिजे. मतदान कार्ड रद्द करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागतो.

हा फॉर्म तुम्ही ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन भरु शकतात. फॉर्ममध्ये तुम्ही माहिती भरुन नाव रद्द करण्यासाठी सांगू शकतात. हा फॉर्म अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe