काय सांगता ! मतदान कार्ड नसेल तरी मतदान करता येणार, ‘ही’ कागदपत्रे सुद्धा मतदानासाठी ग्राह्य धरली जातात

निवडणूक आयोगाकडून मतदारांना अधिका-अधिक प्रमाणात मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पण अनेकांच्या माध्यमातून मतदान कार्ड हरवले असल्याची तक्रार केली जात होती. मतदार यादीत नाव आहे पण माझे मतदान कार्ड हरवले आहे अशी तक्रार अनेकांकडून होत होती. जर तुमचाही असाच प्रॉब्लेम असेल, तुमचेही मतदार यादीत नाव असेल मात्र तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही सुद्धा मतदान करू शकता.

Published on -

Voter ID Card : विधानसभा निवडणुक 2024 साठी उद्या अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काल अर्थातच 18 तारखेला प्रचारांचा झंझावात शांत झाला. आता सर्व जनतेचे आणि नेत्यांचे लक्ष फक्त मतदानाकडे लागले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून मतदारांना अधिका-अधिक प्रमाणात मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पण अनेकांच्या माध्यमातून मतदान कार्ड हरवले असल्याची तक्रार केली जात होती. मतदार यादीत नाव आहे पण माझे मतदान कार्ड हरवले आहे अशी तक्रार अनेकांकडून होत होती. जर तुमचाही असाच प्रॉब्लेम असेल, तुमचेही मतदार यादीत नाव असेल मात्र तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही सुद्धा मतदान करू शकता.

मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

म्हणजे ज्या लोकांचे नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत समाविष्ट असेल त्या लोकांना आता मतदान कार्ड नसेल तर दुसऱ्या 12 प्रकारच्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

ही कागदपत्रे असतील तरीही मतदान करता येणार

भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादी मध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांकडे जर मतदान कार्ड नसेल तर असे लोक आपले आधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह असलेले पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना,

पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तिवेतन दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे कागदपत्र मतदानासाठी वापरू शकतील.

हे सर्व कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण जे अनिवासी भारतीय आहेत त्यांना मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. आम्ही वर जे 12 डॉक्युमेंट सांगितले आहेत त्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

त्यामुळे जर तुमचे मतदार यादीत नाव असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर आता तुम्ही चिंता करण्याचे काहीही एक कारण नाही मतदान कार्ड नसतानाही तुम्हाला मतदान करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News