इंजीनियरिंग करायची आहे, पण कोणत्या ब्रांचला ऍडमिशन घ्यावे सुचत नाही ? मग ‘या’ 4 इंजीनियरिंग कोर्सेसचा विचार करा

Best Engineering Branch : गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे बोर्डाकडून तसेच सीबीएससी बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे आणि आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. खरे तर, बारावीनंतर अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग साठी आणि एमबीबीएस साठी तयारी करतात.

जर तुम्हालाही 12वी नंतर तर इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर इंजीनियरिंग करायचे असे फार लवकर ठरते, पण कोणत्या क्षेत्रात इंजिनिअरिंग करायची? हे काही सुचत नाही. म्हणून आज आपण बारावीनंतर कोणत्या इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायला हवे याबाबत माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

एरोस्पेस इंजिनिअरिंग : तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी एरोस्पेस इंजिनिअरिंग हा पर्याय बेस्ट राहणार आहे. एरोस्पेस इंजीनियरिंग ची डिग्री मिळवल्यानंतर तुम्हाला अवकाश संशोधन व विमान निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळू शकते. ही डिग्री मिळवल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सहज मिळणार आहे.

केमिकल इंजिनिअरिंग : केमिकल इंजीनियरिंगमधून डिग्री केल्यास तुम्हाला क्षेत्रात रसायनांचे उत्पादन, औषधे, अन्न प्रक्रिया यांसारख्या विविध उद्योगांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भारतात केमिकल इंजिनियरला लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी : सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच स्थापत्य अभियांत्रिकी ही सुद्धा इंजीनियरिंग ची एक लोकप्रिय ब्रांच आहे. ही अशी ब्रांच आहे जी की अनेक दशकांपासून विद्यार्थ्यांच्या पसंतीस खरी उतरत आहे. दरवर्षी सिव्हिल इंजिनिअरिंगला लाखो विद्यार्थी एडमिशन घेतात आणि जर तुमचा सुद्धा इंजिनिअरिंगचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी सुद्धा सिविल इंजीनियरिंग एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे. देशभरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांमुळे, वाढत्या शहरीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे या क्षेत्रात भरपूर रोजगाराच्या संधी आहेत. ही डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला खाजगी कंपन्यांमध्ये तसेच सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळू शकते.

बायोमेडिकल इंजिनिअरिंग : सिविल, मेकॅनिकल सारखे इंजीनियरिंग फिल्ड तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही बायोमेडिकल इंजीनियरिंगला ऍडमिशन घेऊ शकता. खरे तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग ही शाखा वैद्यकीय उपकरणांचे डिझाइन, संगणक प्रणाली व आरोग्यविषयक सॉफ्टवेअर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत असते. अलीकडील काळात या क्षेत्रात संशोधनाच्या संधी वाढल्या आहेत अन यामुळे रोजगाराच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. हे डिग्री कम्प्लीट केल्यानंतर लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सहज मिळणार आहे.