Business Idea : काहीतरी युनिक बिझनेस करायचाय ? मग सुरु करा टेन्ट हाऊस बिझनेस, लाखो कमवाल, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : कालानुरूप माणसाने बदलले पाहिजे. आजकाल अनेकांना बिझनेस सुरु करायचा असतो. ते तशा बिझनेस आयडिया देखील शोधत असतात. परंतु अनेक लोक जुन्या बिझनेस आयडियावर काम करतात.

परंतु जर कालानुरूप बदलणाऱ्या व कालानुरूप डिमांड वाढणारा बिझनेस जर आपण स्वीकारला तर नक्कीच आपल्याला मोठी कमाई होईल. तर आज आपण अशाच युनिक बिझनेस विषयी जाणून घेऊव्यात. हा बिझनेस आहे टेंट हाउस बिझनेस.

आज लग्नामध्ये टेन्ट हाऊसची डिमान्ड खूप वाढत चालली आहे. यातून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. चला जाणून घेऊयात या बिझनेस विषयी –

* टेन्ट हाऊस बिझनेसविषयी

सध्या लग्न सराई सुरु होईल. या लग्न सराईमध्ये टेन्ट हाऊस अर्थात युनिक पद्धतीचा मंडप व इतर सुविधा लागतात. याची मोठी डिमांड वाढते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लाकडी खांब किंवा बांबू किंवा लोखंडी पाईप लागतील.

यासोबतच पुरवण्यासाठी खुर्च्या किंवा कार्पेट, पंखे, गाद्या, लाइटिंग आदींची देखील आवश्यकता लागेल. तुम्ही जितके जास्त डेकोरेटिव्ह गोष्टी द्याल तितकी तुमची डिमांड वाढेल. व तुमचा बिझनेस वाढत जाईल. यासोबतच तुम्ही आणखीही सुविधा पुरवू शकता.

जर तुम्ही यासोबतच पाणी पुरवले तर पिण्याचे पाणी आणि मोठे ड्रम देखील लागतील. लग्न आणि पार्ट्यांमध्ये अनेक प्रकारची सजावट केली जाते, त्यामुळे म्युझिक सिस्टीम, कार्पेट, अनेक प्रकारचे लाइटिंग, विविध प्रकारची फुले इत्यादी सजावटीशी संबंधित वस्तू खरेदी करणे महत्त्वाचे ठरेल.

* सासाधारण किती लागेल भांडवल

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी साधारण बराच खर्च येईल. तुम्हाला कोणत्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. व त्यावर खर्च अवलंबून आहे. जर तुम्ही या व्यवसायात नवीन असाल आणि पैशांची कमतरता असेल तर

तुम्ही सुरुवातीला कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता. साधारणपणे 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने हा व्यवसाय सुरू करता येतो. परंतु जर पैसे तुमच्याकडे असतील तर साधारण 5 लाख रुपये खर्च करून तुम्ही मोठा व्यवसाय सुरु करू शकता.

* किती नफा मिळेल

तुमच्या परिसरात तुम्ही चांगली सर्व्हिस दिली व बिझनेस वाढला तर तुम्ही हजारो रुपये कमवाल. या व्यवसायातून तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात 25 ते 30 हजार रुपये महिन्याला सहज कमवू शकता. बिझनेस जसा वाढेल, लग्नसराई येईल तसा तुमचा नफा वाढत जाईल. साधारण लाखभर रुपये देखील तुम्ही महिन्याला कमाऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe