Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. आता उन्हाळा अंतिम टप्प्यात नागरिकांसाठी त्रासदायक सिद्ध होत असून उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे सर्वसामान्यांसहित शेतकरी आतुरतेने मान्सून आगमनाची वाट पाहत आहेत.
उत्तर महाराष्ट्रात देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून जळगाव जिल्ह्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 40 अंशाच्या आसपास तापमान नोंदवले जात आहे. यामुळे जळगावकर नागरिक परेशान झाले असून मान्सून केव्हा बरसणार? अशी विचारणा केली जात आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सून संदर्भात एक मोठी बातमी देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात मान्सूनचे तीन दिवस उशिराने आगमन होणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; ‘या’ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई !
10 जून ते 12 जून च्या दरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रातील तळ कोकणात आगमन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवसा ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळू शकते. विशेष बाब म्हणजे या दोन दिवसानंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात कडाक्याचे ऊन पडणार आहे. सात जून पर्यंत जळगाव जिल्ह्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
आता येत्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी देखील यामुळे उकाड्यांमध्ये फारशी घट होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- कारल्याच्या ‘या’ जातीची लागवड करा; विक्रमी उत्पादन मिळणार !
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 3 जून 2023 रोजी जळगाव जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत उष्णता जाणवणार आहे. मात्र त्यानंतर सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी भागात वादळी पाऊस पडणार आहे.
विशेष म्हणजे यादरम्यान तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. निश्चितच वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला आगामी 2 दिवस विशेष सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
हे पण वाचा :- गुड न्युज आली ! मान्सून केरळात दाखल? भारतीय हवामान विभागाची माहिती, ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस