लग्नात दिलेल्या सोन अन दागिन्यांवर घटस्फोटानंतर पती की पत्नी, कोणाचा अधिकार ? हायकोर्टाचा मोठा निर्णय

लग्नात नवरीला देण्यात आलेल्या सोन चांदीच्या दागिन्यांवर कोणाचा अधिकार असतो ? जर एखाद्या दांपत्याचा घटस्फोट झाला तर लग्नात घातलेले दागिने पतीला मिळतात की पत्नीला, याबाबत तुम्ही कधी विचार केलाय का ? नाही ना, मग आता याच संदर्भात केरळ उच्च न्यायालयाकडून महत्त्वाचा निकाल समोर आला आहे.

Published on -

Wedding Gold Rights : सध्या लग्न सराईचा सीजन सुरु आहे. लग्न सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दाग दागिने बनवले जात आहे. यामुळे सध्या सराफा बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

सोन जवळपास एक लाख रुपये प्रति तोळाच्या रेंजमध्ये आले असतानाही सोने खरेदीसाठी नागरिक उत्साही असल्याचे दिसते. मात्र लग्नात दिलेल्या दागिन्यांवर, सोन्यावर घटस्फोटानंतर पती की पत्नी कोणाचा अधिकार असतो? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का.

खरंतर अनेकांच्या माध्यमातून जर एखाद्या दांपत्याचा घटस्फोट झाला तर त्यांच्या लग्नात वधुला घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवर कुणाचा अधिकार असतो असा प्रश्न विचारला जात होता.

दरम्यान आता याच संदर्भात हायकोर्टातून एक महत्त्वाचा निकाल समोर येत आहे. आता आपण हायकोर्टाचा हा निकाल नेमका काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे हायकोर्टाचा निकाल?

केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देतांना लग्नात घातलेल्या दागिन्यांवर घटस्फोटानंतर कुणाचा अधिकार हे स्पष्ट केले आहे. केरळ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एमबी स्नेहलता यांच्या खंडपीठासमोर एका महत्त्वाच्या प्रकरणात नुकतीच सुनावणी झाली.

यावेळी माननीय न्यायालयाने आपल्या निकालात असे नमूद केले आहे की, लग्नात वधूला भेट म्हणून दिलेलं सोनं आणि रोख रक्कम ही तिची मालमत्ता किंवा स्त्रीधन मानलं जातं, म्हणजेच या दागिन्यांवर वधूचा अधिकार असतो.

केरळ उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात घटस्फोटानंतर महिलेच्या पालकांनी सोने खरेदीचे कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली आणि याच्या आधारावर न्यायालयाने पत्नीला 60 तोळे सोने किंवा सध्याचे बाजारमूल्य परत करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती समोर आली आहे. आता आपण हे प्रकरण नेमकं काय होतं याचा संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

काय होत संपूर्ण प्रकरण ?

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, घटस्फोटीत महिलेचं लग्न 2020 मध्ये झालं त्यावेळी तिला कुटुंबियांनी 63 तोळे सोन दिल होत, यामध्ये दोन साखळ्या आणि इतर दागिन्यांचा समावेश होता. याशिवाय नातेवाईकांनीही 6 तोळं सोनं तिला भेट म्हणून दिलं होतं.

दरम्यान लग्नानंतर सासरच्या लोकांनी नेहमी वापरत असलेले दागिने वगळता इतर दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने काढून घेतलेत आणि त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्याकडे पैशांची मागणी केली. पतीने आपल्या पत्नीकडून 5 लाखांची मागणी केली.

मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिला आणि पुढे हे प्रकरण आणखी बिघडले. यातूनच पुढे या दांपत्याचा घटस्फोट झाला. दरम्यान, घटस्फोटानंतर महिलाच पती तिला मिळालेल्या भेटवस्तू आणि दागिन्यांवर हक्क सांगत होता.

म्हणूनच घटस्फोटीत महिलेने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केले होते. केरळच्या एर्नाकुलममधील कलामसेरी येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान आता या या प्रकरणात महिलेच्या बाजूने निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News