Viral Railway News : गोवा हे एक वैश्विक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अनेकजण गोव्याला पिकनिक साठी जातात. महाराष्ट्रातून देखील गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. मुंबई आणि पुण्यातून गोव्याला अनेक जण पर्यटनासाठी दाखल होत असतात. दरम्यान मुंबई आणि पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी अनेकजण रेल्वेचा वापर करतात.
पुण्याहून गोव्याला रेल्वे मार्गाने प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना जवळपास दहा तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. पुणे ते गोवा हे जवळपास 460 किलोमीटर इतके अंतर आहे. आता तुम्हाला पुणे ते गोवा हा दहा तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये शक्य होणार असे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून परत रिटर्न पुण्याला फक्त एका तासात अन तेही रेल्वेने असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वासच बसणार नाही. मात्र जगात अशी एक सुपरफास्ट ट्रेन सुरू झाली आहे ज्यामुळे ही गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते.
अलीकडेच जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली असून ही रेल्वे गाडी तब्बल 700 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. ताशी 700 चा स्पीड ही गाडी फक्त दोन सेकंदात पकडते. अर्थातच ही रेल्वेगाडी विमानापेक्षा अधिक स्पीडने धावते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सुपरफास्ट ट्रेन नेमकी कुठे सुरू झाली आहे या गाडीची चाचणी नेमकी कुठे सुरू आहे? चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात याबाबत सविस्तर.
चीनमध्ये सुरू झाली जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनची चाचणी
जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनची चाचणी चायना मध्ये सुरू आहे. चीनने चुंबकीय उत्सर्जन म्हणजेच मॅगलेव्ह तंत्रज्ञानात एक नवीन माईलस्टोन गाठला आहे. चायना मध्ये अलीकडेच मॅग्लेव्ह ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे. मॅग्लेव्ह म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन. ही ट्रेन एका विशिष्ट रूळावर धावते आणि गाडी रुळापासून काही सेंटीमीटर हवेत तरंगत चालते.
म्हणजेच आपल्याकडे जशा ट्रेन सामान्य रेल्वे ट्रॅक वर चाकांवर धावताना दिसतात तशी ही गाडी चाकांवर धावत नाही, तर हवेत तरंगते. ही ट्रेन चुंबकीय शक्ती वापरून हवेत तरंगते आणि सुपरफास्ट वेगाने धावते. दरम्यान चायना मध्ये राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठच्या शास्त्रज्ञांनी आता एका मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी केली आहे. यात फक्त 1 टन वजनाच्या चाचणी वाहनाला ताशी 700 किलोमीटरने चालवले गेले. ही चाचणी 400 मीटर लांबीच्या ट्रॅकवर झाली अन हे अंतर या रेल्वे गाडीने फक्त दोन सेकंदात पूर्ण केले. तसेच वाहन सुरक्षित ठिकाणी देखील आणण्यात आले.
चाचणीसाठी वापरण्यात आलेली ही ट्रेन प्रवासी ट्रेन नव्हती तर संशोधन आणि चाचणीसाठी डिझाईन केलेली ट्रेन सारखी स्लज होती. नक्कीच अशा प्रकारची ट्रेन जर मालवाहतुकीसाठी किंवा प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झाले तर यामुळे प्रवास फारच गतिमान होणार आहे. मात्र अजून ही ट्रेन चाचणीच्या प्रक्रियेत आहे. पण येत्या काळात चायन्यामध्ये 700 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी ही गाडी प्रत्यक्षात सुरू झाली तर नवल वाटण्यासारखे काही राहणार नाही. कारण की चायना मध्ये आधीपासूनचं अशा सुपरफास्ट हायस्पीड ट्रेन सुरू आहेत. मात्र सध्या ज्या गाडीची चाचणी केली जात आहे ती गाडी मागील गाड्यांपेक्षा अधिक वेगवान ठरणार आहे.