Success Story : काय सांगता ! सायकलवर पुरणपोळी विकून उभारली करोडोंची कंपनी, कोण आहे हा अवलिया? जाणून घ्या सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:
Success Story

Success Story : आजकाल अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत. मात्र व्यवसाय कसा आणि कोणता करायचा हे अनेकांना माहिती नसते.

तुम्ही कोणताही व्यवसाय करणार असाल तरतो व्यवसाय पूर्णपणे यशस्वी करण्याचा प्लॅन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

अंगात जिद्द असेल तर काहीही करणे अशक्य नाही ते एका सायकलवर पुरणपोळी विकणाऱ्या व्यक्तीने करून दाखवले आहे. कर्नाटकचे रहिवासी के.आर.भास्कर यांनी सायकलवर पुरणपोळी विकून आता करोडोंची कंपनी स्थापित केली आहे.

तुम्हीही अनेकदा व्यवसाय करणाऱ्यांच्या यशस्वी गाथा ऐकत असाल. अनेकजण कठीण काळातून त्यांच्या व्यवसायाला योग्य दिशा देत असतात. या व्यवसातून ते करोडो रुपयांची कमाई करत असतात. असेच के.आर.भास्कर यांनी केले आहे.

के.आर.भास्कर हे पुरणपोली घर कंपनीचे मालक आहेत. ते त्यांच्या या व्यवसायातून करोडो रुपयांची कामाची करत आहेत. त्यांनी त्यांचा हा पुरणपोळी विकण्याचा व्यवसाय करोडो रुपयांचा कसा केला हे जाणून घेऊया.

अशा प्रकारे पुरणपोळी घराची सुरुवात झाली

केआर भास्कर हे कर्नाटक राज्यातील एक गरीब कुटुंबात जन्माला आलेले व्यवसायिक आहेत. जे सध्या पुरणपोली घर कंपनीचे मालक आहेत. केआर भास्कर यांचे लहानपणापासूनच काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्यांनी लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली.

केआर भास्कर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ते बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये वयाच्या 12 व्या वर्षी वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी हॉटेलमध्ये 5 वर्षे भांडी आणि टेबल साफ करण्याचे काम केले.

तसेच त्यांनी 8 वर्षे नृत्य प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे. यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्या देखील केल्या. मात्र त्यांचे यामध्ये मन न लागल्याने त्यांनी सायकलवर पुरणपोळी विकून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला.

सायकल विकून करोडोंची कंपनी बनवली

के.आर. भास्कर यांनी दररोज सायकलवरून पुरणपोळी विकण्यास सुरुवात केली. के.आर. भास्कर यांची कुकिंग शोमध्ये निवड झाली, त्यानंतर भास्कर स्थानिक भागात लोकप्रिय झाले. त्यांनी त्यांच्या पुरणपोळी विकण्याच्या व्यवसायाचे रूपांतर हळूहळू ब्रँडमध्ये केले. कर्नाटकमध्ये त्यांनी त्यांचे पहिले पुरणपोळी घर आऊटलेट सुरु केले त्यांनी त्यांनंतर त्यांच्या व्यवसायाला भरभराटी मिळाली.

अनेक दुकाने उघडली आहेत

के.आर. भास्कर यांच्या पुरणपोळी घरला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांचा वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात त्यांच्या पुरणपोळी घरचे आऊटलेट्स उघडली. ही आऊटलेट्स उघडल्यानंतर त्यांच्या कंपनीची कमाई करोडो रुपयांमध्ये सुरु झाली. आता त्यांची कंपनी 1000 हून अधिक पुरणपोळी विकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe