7 seater Cars Budget : नव्याने कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरं तर, भारतात सेव्हन सीटर कारची नेहमीच डिमांड राहते आणि तुम्ही पण सेवन सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर नक्कीच आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
कारण की, आज आपण देशातील टॉप 5 बेस्ट सेलिंग सेव्हन सीटर कार खरेदी करण्यासाठी किमान किती बजेट लागेल आणि यासाठी एका व्यक्तीचा पगार किती हवा जेणेकरून त्याला सेवन सीटर कार वापरणे परवडेल याबाबतची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

7 सीटर कार खरेदी करणे सोपे काम नाही. कुटुंबाचा आराम, बजेट, मेंटेनन्स खर्च आणि मासिक हप्ता (EMI) यांचा समतोल साधावा लागतो. यामुळे आपल्यापैकी अनेकांना कमी पगारात कोणती 7 सीटर कार परवडेल, हा प्रश्न पडलेला असेल.
दरम्यान आज आपण याच साऱ्या पार्श्वभूमीवर भारतातील 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या 7 सीटर कार, त्यांचा अंदाजे EMI आणि आवश्यक किमान पगार यांचा आढावा घेऊया. पण, आज आपण इथे जे कॅल्क्युलेशन पाहणार आहोत त्यासाठी दहा टक्के व्याजदर पाच वर्षांचा टाईम पिरेड आणि पगाराच्या 25% रक्कम ईएमआय साठी वापरली आहे.
मारुती एर्टिगा : ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. ही कार विश्वासार्हता, स्पेस आणि कम्फर्ट साठी ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. एर्टिगाची मुंबईत ऑन-रोड प्राईस 10.30 लाख रुपयांपासून ते 15.33 लाख रुपयांपर्यंत आहे. यासाठी महिन्याचा ईएमआय हा 16827 रुपयांपासून ते 23 हजार 70 रुपयांपर्यंत जाईल. अर्थात ज्या लोकांचा मासिक पगार 67 हजार रुपयांपासून 98 हजार रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी गाडी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
महिंद्रा स्कॉर्पिओ N : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची ही एसयूव्ही ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय असून ही गाडी सुद्धा भारतीय कार मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत येते. ही गाडी आपला दमदार लूक, शक्तिशाली इंजिन आणि ऑफ-रोड क्षमतेमुळे फार आधीपासून लोकप्रिय आहे. या गाडीची मुंबईतील ऑन रोड किंमत ही साधारणतः 15.86 लाख रुपयांपासून ते 29.49 लाख रुपयांपर्यंत जाते. आता ही गाडी खरेदी करण्यासाठी साधारणतः 25000 रुपयांपासून ते 47 हजार रुपयांपर्यंतचा ई एम आय भरावा लागेल. म्हणजेच ही एसयुव्ही खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीचा किमान मासिक पगार हा एक लाख रुपयांपासून ते 1.84 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
महिंद्रा बोलेरो निओ : ही गाडी ग्रामीण भागात फारच लोकप्रिय आहे. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर ही दमदार गाडी मोठ्या प्रमाणात नजरेस पडते. या गाडीची मुंबईतील किंमत 10.16 लाख रुपयांपासून ते 12.71 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या गाडीसाठी मासिक 16,234 ते 20 हजार रुपयांपर्यंतचा हप्ता भरावा लागू शकतो. तुम्ही जर ही गाडी घेण्याची तयारीत असाल तर तुमचा किमान पगार 65 हजार रुपयांपासून ते 80 हजार रुपयांपर्यंत असायला हवा.
किया कॅरेन्स क्लॅव्हिस : नवीन जनरेशन MPV म्हणून किया कॅरेन्स क्लॅव्हिस चर्चेत आहे. ही आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइन असणारी MPV एर्टिगाला जोरदार टक्कर देत आहे. या SUV ची किंमत 13.14 लाख रुपयांपासून ते 24.61 लाख रुपये एवढी आहे. ही गाडी हफ्त्यावर घेतल्यास गाडीचा EMI 21000 रुपयांपासुन ते 36 हजार 800 रुपये इतका राहणार आहे. अशा स्थितीत ही गाडी खरेदी करण्यासाठी मासिक पगार हा 84 हजार रुपये ते 1.47 लाख रुपये दरम्यान असणे आवश्यक आहे.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस – आरामदायी प्रवास, भरपूर स्पेस आणि टोयोटाची विश्वासार्हता यासाठी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार ओळखली जाते. या गाडीची किंमत मुंबईत 23.24 लाख रुपये ते 39.34 लाख रुपये एवढी आहे. या गाडीसाठीचा EMI 36 हजार रुपये ते 61 हजार रुपये इतका जातो. ही गाडी खरेदी करण्यासाठी किमान 1.44 लाख ते 2.44 लाख दरम्यान पगार असणे आवश्यक आहे.













