Marathi News : जगभरात शास्त्रज्ञ इतिहासातील रहस्यमय घटनांचा सतत शोध घेत असतात. या शोधातून जुन्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीबद्दलची खूप सारी माहिती मिळते. याबरोबरच त्या काळातील लोक कसे राहत होते,
समाजव्यवस्था, चालीरिती हे यातून कळते. अशाच शोधातून जगातील पहिले चुंबन कधी घेण्यात आले होते, याची माहिती समोर आली आहे. तब्बल ४५०० वर्षांपूर्वी पहिले चुंबन घेण्यात आले होते, याचा पुरावाही शोधकर्त्यांना सापडला आहे. यापूर्वी ३५०० वर्षांपूर्वी पहिले चुंबन घेतल्याचे मानले जात होते.
हा शोध मध्य पूर्वच्या प्राचीन ठिकाणी लागला होता. हा शोध मेसोपोटामिया समाजात पहिले चुंबन घेतल्याची साक्ष देतो. याची नोंद २५०० इ.स. पूर्वीच्या प्राचीन ग्रंथामध्येही आहे. शोधकर्त्यांनी याचे प्रमाणही दिले आहे.
यापूर्वीच्या शोधात चुंबनाचा पहिला पुरावा भारतात सापडला होता. १५०० इ.स.पूर्वीच्या प्राचीन भारतातला हा पुरावा होता. मात्र नवीन अभ्यासात आणि प्राचीन मेसोपोटामिया ग्रंथातून समजते की,
ही मध्य पूर्वमधील एक रोमँटिक प्रथा होती. डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील मेसोपोटामिया इतिहास तज्ज्ञ डॉ. ट्रॉल पंक आर्बोल म्हणाले की, प्राचीन मेसोपोटामियामध्ये जो सुरुवातीच्या मानव संस्कृतींचे नाव मानले जाते.
आताच्या इराक आणि सीरियामध्ये हा भाग मोडतो. युफ्रेट्स आणि टायग्रिस नद्यांच्या दरम्यान मेसोपोटामिया संस्कृती अस्तित्वात होती. त्यावेळी लोक मातींच्या पट्ट्यावर कलाकार लिपीमध्ये लिहीत होते. यात हजारो मातीच्या पट्ट्या आजही उपब्लध आहेत आणि यात स्पष्ट पुरावा मिळतो की, चुंबनाला प्राचीन काळी रोमँटिक अंतरंगाचा एक भाग मानले जात होते.