Sandeep Maheshwari Income : इंस्टाग्राम आणि You Tube वरून मिळणारे करोडो रुपये न घेणाऱ्या संदीप माहेश्वरी यांना आर्थिक कमाई कुठून होते? जाणून घ्या…

Ahmednagarlive24 office
Published:
Sandeep Maheshwari Income

Sandeep Maheshwari Income : सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही देखील संदीप माहेश्वरी यांच्याबद्दल ऐकले असेल किंवा पाहिले असेल. संदीप माहेश्वरी हे सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. संदीप माहेश्वरी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत.

संदीप माहेश्वरी हे इंस्टाग्रामी आणि यूट्यूब वरून लाखो करोडो रुपयांची कमाई करत आहेत. पण ते यूट्यूब संदीप वरून होणारी कमाई कधीही घेत नाहीत. माहेश्वरी यांना लाखो लोक आजही फॉलो करत आहेत. त्यांच्या कमाईबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे असते.

तुम्हालाही संदीप माहेश्वरी यांच्या आर्थिक उत्पनाबद्दल जाणून घेईचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज तुम्हाला संदीप माहेश्वरी यांच्या आर्थिक कमाईबद्दल सांगणार आहोत.

कोण आहे संदीप माहेश्वरी?

संदीप माहेश्वरी हे एक भारतातील लोकप्रिय प्रेरक वक्ता, YouTuber, उद्योजक, Influencer आहेत. तसेच ते ImagesBazaar या कंपनीचे संस्थापक देखील आहेत. संदीप माहेश्वरी हे You Tube वर सतत प्रेरक व्हिडिओ अपलोड करत असतात. त्यामुळे अनेकजण संदीप माहेश्वरी यांचे फॅन आहेत.

संदीप माहेश्वरी यांनी 5 ते 10 वर्षांपूर्वी देशभरात मोफत मोटिव्हेशनल सेमिनार घेण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मोटिव्हेशनल सेमिनारला चांगला प्रतिसाद देखील मिळत होता. हजारो लोक त्यांचे मोटिव्हेशनल सेमिनार ऐकण्यासाठी येत असत. संदीप माहेश्वरी देशातील सर्वात लोकप्रिय मोटिव्हेशनल स्पीकर आणि YouTuber आहेत.

संदीप माहेश्वरी प्रतिज्ञा

संदीप माहेश्वरी यांचे यूट्यूब चॅनलवर 28 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत तर इंस्टाग्रामवर 5 दशलक्षाहून अधिक त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. मात्र संदीप माहेश्वरी यांनी फार पूर्वीच शपथ घेतली होती की,

तो सोशल मीडियावरून एक रुपयाही घेणार नाहीत. त्यांचे सर्व मोटिव्हेशनल व्हिडीओ मोफत असतील. ते आजही इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरून एकही रुपया कमवत नाहीत.

संदीप माहेश्वरी इनकम

संदीप माहेश्वरी यांच्या आर्थिक उत्पन्न कुठून येते असा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. संदीप माहेश्वरी यांचे मुख्य उत्पन्न इमेजबाझार या व्यवसायातून येते. इमेजबाझार या व्यवसायातून ते दरमहा २५ ते ३० लाख रुपये कमावतात. त्यांचे नेट वर्थ सुमारे 10 कोटी रुपये आहे. संदीप माहेश्वरी यांनी नेट वर्थ सामायिक केली नाही.

संदीप माहेश्वरी YouTube उत्पन्न

संदीप माहेश्वरी यांचे यूट्यूब चॅनेलवर 28 लाखांहून अधिक फॉलोवर आहेत. त्यांच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात. मात्र ते युट्युबवरून एकही रुपया कमवत नाहीत. कारण त्यांनी त्यांच्या चॅनेलवरील सर्व जाहिराती बंद केल्या आहेत.

जाहिरातीमुळे त्यांच्या दर्शकांचे लक्ष विचलित होईल यामुळे त्यांनी जाहिराती चालू ठेवलेल्या नाहीत. तसेच ते कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन करत नाहीत.

संदीप माहेश्वरी यांचे इंस्टाग्रामवर 5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर देखील ते मोटिव्हेशनल व्हिडीओ आणि लोकांच्या आयुष्याशी निगडित व्हिडीओ अपलोड करत असतात. इंस्टाग्रामवरही संदीप माहेश्वरी कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन करत नाहीत. जर त्यांनी ब्रँडचे प्रमोशन केले तर ते 10 लाख रुपये सहज कमवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe