FD News : फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरेतर फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक जण एफडी मध्ये गुंतवणूक करतात. मात्र अलीकडील काही महिन्यांमध्ये देशातील सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांनी आपल्या एफ डी व्याजदरात कपात केली आहे .
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर बँकांनी देखील त्यांच्या एफडी योजनांच्या व्याज दरात कपात करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या वर्षी अर्थात 2025 मध्ये देशातील अनेक बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात केली आहे आणि आता यावर्षी देखील अनेक बँका फिक्स डिपॉझिट व्याजदरमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सध्या देशातील कोणत्या बँका 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक रिटन देत आहेत याबाबतची माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

पंजाब नॅशनल बँक : ही बँक सध्या एका वर्षाच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे. अर्थात यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षांनी गुंतवणूकदारांना एक लाख 6 हजार 398 रुपये मिळणार आहे. म्हणजेच 6398 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
ॲक्सिस बँक: या बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांना सुद्धा एका वर्षांच्या FD वर 6.25 टक्के दराने व्याज दिले जात असून यामध्ये एका वर्षांसाठी एक लाखाची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6 हजार 398 रुपयांच व्याज मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदा : ही बँक पण एका वर्षाच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे. अर्थात यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षांनी गुंतवणूकदारांना एक लाख 6 हजार 398 रुपये मिळणार आहे. म्हणजेच 6398 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
एचडीएफसी : प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक अर्थात एचडीएफसी. ही बँक पण आजच्या घडीला एका वर्षाच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे. अर्थात यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षांनी गुंतवणूकदारांना एक लाख 6 हजार 398 रुपये मिळणार आहे. म्हणजेच 6398 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशाची सर्वात मोठी सरकारी बँक आणि ही बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एका वर्षाचे एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे.













