Share To Buy : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरे तर नवीन वर्ष सुरू होऊन फक्त दोन दिवसांचा काळ झाला आहे. दरम्यान या नव्या वर्षात अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा प्लॅन आखत आहेत.
आता तुमचा पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर आजची बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण 2026 मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवणाऱ्या टॉप 5 शेअर्स बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. Refinitiv या संस्थेने सुचवलेल्या शेअर्स बाबत आज आपण येथे माहिती पाहणार आहोत.

हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न
Gabriel India Ltd : शेअर मार्केट मधील हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 2026 या वर्षात 46 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो असा अंदाज आहे. यासाठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे.
Tata Chemicals Ltd : या यादीतला दुसरा स्टॉक टाटा समूहाचा आहे. टाटा समूहाचा हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षात 41 टक्के रिटर्न देणार असा अंदाज आहे. यासाठी गुंतवणूकदारांकरीता होल्ड रेटिंग देण्यात आली आहे. अर्थात ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केली असेल त्यांनी ती गुंतवणूक होल्ड करून ठेवावी असे सांगितले जात आहे.
Jupiter Life Line Hospitals Ltd : फार्मा सेक्टर मध्ये ज्यांना गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी हा स्टॉक फायद्याचा ठरू शकतो. हा मिडकॅप सेगमेंट मधील शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 39% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. हे वर्ष या कंपनीसाठी अधिक खास ठरणार आहे आणि म्हणूनच ब्रोकरेज कडून यासाठी स्ट्रॉंग बाय रेटिंग देण्यात आली आहे.
Bharat Dynamics Ltd : हा स्टॉक या वर्षात गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. हा लार्ज कॅप शेअर होल्ड करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अर्थात तुमच्या पण पोर्टफोलिओ मध्ये हा शेअर असेल तर तुम्ही पुढील काही काळ हा शेअर होल्ड करून ठेवायला काही हरकत नाही.
Garware Technical Fibres Ltd : या शेअर साठी स्ट्रॉंग बाय रेटिंग देण्यात आली आहे. हा मिड कॅप शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो.













