Who is Gauri Spratt : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक अशी बातमी दिली आहे, गेल्या काही दिवसांपासून गौरी स्प्राट हे नाव चर्चेत आहे, आणि तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आमिर खानने गौरीसोबतच्या आपल्या नात्याविषयी सांगितले की, ते गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि मागील १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मुंबईत एका पत्रकार परिषदेत आपल्या प्रेयसी गौरी स्प्राटची अधिकृत ओळख करून दिली.
१४ मार्च रोजी आमिर खानने आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. त्याने सांगितले की आपल्या खास दिवसाच्या निमित्ताने तो कुटुंबीयांसोबत आणि गौरीसोबत एक खास डिनर आयोजित करत आहे. आमिर खान आणि गौरी स्प्राट यांचे नाते अधिकृत झाल्यानंतर चाहते त्यांच्या पुढील प्रवासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

गौरी स्प्राटचे बालपण आणि शिक्षण
गौरी स्प्राट ही मूळची बेंगळुरूची असून तिचे बहुतांश आयुष्य तिथेच गेले आहे. तिची आई रीता स्प्राट बेंगळुरूमध्ये एक प्रसिद्ध सलून मालकीण आहे. गौरीच्या शिक्षणाची सुरुवात ब्लू माउंटन स्कूलमधून झाली. पुढे तिने २००४ मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए पूर्ण केले.
गौरी स्प्राटच करिअर
गौरीने सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सध्या मुंबईत “बीब्लंट” सलून चालवत आहे, जो सौंदर्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. याशिवाय, तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती आता आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये देखील कार्यरत आहे.
गौरी आणि आमिर खान यांचे नाते
गेल्या दीड वर्षांपासून आमिर आणि गौरी रिलेशनशिपमध्ये असून, हे नाते त्यांनी अत्यंत खाजगी ठेवले होते. याआधीही आमिर खानबद्दल चर्चा होती की तो इंडस्ट्रीबाहेरील एखाद्या व्यक्तीला डेट करत आहे, मात्र त्याचे नाव समोर आले नव्हते. पत्रकार परिषदेदरम्यान, आमिरने आपल्या चाहत्यांना सांगितले की त्याने अत्यंत मेहनतीने हे नाते मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवले. गौरी बंगळुरूमध्ये राहत असल्याने दोघांचे भेटणे तुलनेने सोपे आणि खाजगी राहिले.
गौरीची कुटुंब आणि मित्रांशी ओळख
आमिर खानने अलीकडेच गौरीची ओळख आपल्या कुटुंबीयांना आणि दशकांपासूनचे मित्र असलेल्या शाहरुख खान आणि सलमान खानला करून दिली. १२ मार्च रोजी या दोन्ही अभिनेत्यांनी आमिरच्या घरी जाऊन गौरीची भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर या नात्याची अधिक चर्चा सुरू झाली.