Sandeep Maheshwari And Vivek Bindra Net Worth : सध्या सोशल मीडियामध्ये मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि मोटिवेशनल स्पीकर तथा उद्योगपती विवेक बिंद्रा यांच्यात मोठा वाद सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर एक व्हिडिओ पब्लिश केला होता. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव न घेता एक मोठा युट्युबर खूपच मोठा स्कॅम करत असल्याचा आरोप लगावला होता. यानंतर, सोशल मीडियामध्ये विवेक बिंद्रा यांच्यावरच माहेश्वरी यांनी आरोप केला असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात.

नंतर मग विवेक बिंद्रा यामध्ये इन्व्हॉल्व झालेत. आता या दोघांचा वाद शिगेला पोहोचला आहे. माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नुकतेच सांगितले आहे. यासाठी माहेश्वरी आपल्या यूट्यूब चैनलच्या कमाईचा वापर करणार आहेत.
यामुळे त्यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर मॉनिटायझेशन सुरू केले आहे. परिणामी हे दोघे युट्युबर आणि मोटिवेशनल स्पीकर सध्या चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यापैकी सर्वात श्रीमंत कोण ? याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप माहेश्वरी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1980 ला दिल्ली येथे झाला आहे. तसेच विवेक बिंद्रा यांची डेट ऑफ बर्थ 5 एप्रिल 1982 ही आहे. अर्थातच माहेश्वरी हे विवेक बिंद्रा यांच्या पेक्षा वयाने मोठे आहेत. या दोघांमधील वयाचा अंतर हा फक्त दोन वर्षांचा आहे.
पण तरीही माहेश्वरी वयाने मोठे असल्याने या दोघांच्या मध्ये झालेल्या वादात अनेकदा बिंद्रा यांनी संदीप माहेश्वरी यांना बडे भाई असे म्हणून संबोधले आहे. दरम्यान दिल्लीमध्ये जन्मलेले हे दोन्हीही मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या दोघांनी आजच्या घडीला आपल्या मेहनतीने करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे.
पण, अनेकांच्या माध्यमातून या दोघांची नेट वर्थ किती आहे असा सवाल उपस्थित होत होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात विवेक बिंद्रा यांच्याकडे सर्वात जास्त पैसा. मीडिया रिपोर्ट नुसार माहेश्वरी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने सुरू केली होती.
मॉडेलिंगमध्ये मात्र माहेश्वरी यांना यश मिळाले नाही. पण ते खचले नाहीत आणि त्यांनी 2006 मध्ये इमेजेस बाजार या कंपनीची सुरुवात केली. आजच्या घडीला ही कंपनी भारतातील सर्वात मोठी इमेजेसची कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. दरम्यान या व्यवसायात माहेश्वरी यांचा चांगला जम बसल्यानंतर त्यांनी मोटिवेशनल स्पीचिंगला सुरुवात केली.
मोटिवेशनल स्पीकर म्हणून ते अवघ्या काही वर्षातच संपूर्ण देशात लोकप्रिय झालेत. यानंतर त्यांनी त्यांचा यूट्यूब चैनल सुरू केला. आजच्या घडीला माहेश्वरी यांच्या youtube चैनल वर 28.4 मिलियन सबस्क्राईबर आहेत. माहेश्वरी यांच्याकडे एकूण चार मिलियन डॉलर म्हणजेच 33 करोड रुपयांची संपत्ती आहे.
याशिवाय त्यांच्याकडे प्रॉपर्टीमध्ये घर आणि लँड अशी 17 कोटींची प्रॉपर्टी आहे. याशिवाय दिल्लीच्या प्रीतमपुरा येथे त्यांचे एक ऑफिस देखील आहे. ते दरवर्षी तीन ते चार कोटी रुपये कमवतात. दुसरीकडे विवेक बिंद्रा यांच्याबाबत बोलायचं झालं तर बिंद्रा हे बडा बिझनेस कंपनीचे फाउंडर आहेत.
ते लोकांना बिजनेसचे धडे देतात. पण याच बडा बिजनेसवरुन सध्या माहेश्वरी आणि बिंद्रा यांच्यात वाद आहेत. या बिझनेसच्याआड बिंद्रा लोकांची ठगी करत असल्याचा गंभीर आरोप माहेश्वरी यांनी केला आहे. या बिझनेसच्याआड विवेक बिंद्रा मल्टी लेव्हल मार्केटिंग स्कॅम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान बडा बिजनेस फाउंडरचे सीईओ विवेक बिंद्रा यांच्याकडे एकूण 11 मिलियन डॉलर अर्थातच 90 कोटी रुपयांची नेटवर्क आहे. याशिवाय बिंद्रा यांचे दिल्लीत एक घर आहे तसेच मुंबई आणि नोएडा मध्ये देखील त्यांनी रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली आहे. सध्या ते नोएडात वास्तव्यास असून ते दरवर्षी सात ते नऊ कोटी रुपयांची कमाई करत आहेत.