अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील बैठकीत केवळ युद्धावर चर्चा झाली नाही, तर एका वेगळ्याच मुद्द्यावर चर्चेची ठिणगी पडली. अमेरिकन माध्यमांनी झेलेन्स्की यांना विचारले की त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत सूट का घातले नाही? यावर झेलेन्स्की यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलं आहे.
झेलेन्स्कींचे कपडे
झेलेन्स्की गेल्या तीन वर्षांपासून सतत काळ्या कलरचे अत्यंत स्वस्त आणि साधे कपडे घालत आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या पेहरावात मोठा बदल केला आहे. यापूर्वी लक्झरी ब्रँड ब्रियोनीचे लाखो रुपयांचे सूट घालणारे झेलेन्स्की आता सध्या कपड्यांमध्ये दिसतात. त्यांच्या कपड्यांची किंमत १३ डॉलर्सचे जॅकेट, ३५ डॉलर्सची पॅन्ट, ६.८० डॉलर्सचा टी-शर्ट आणि ६७ डॉलर्सचे स्नीकर्स एवढीच आहे.

बैठकीत ट्रम्प यांची प्रतिक्रिया
बैठकीदरम्यान झेलेन्स्कींच्या कपड्यांवर प्रश्न विचारला गेल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना समर्थन दिलं. ते म्हणाले, “अध्यक्ष महोदय, तुम्ही छान दिसता.” यामुळे बैठकीतील वातावरण थोडं हलकं झालं. ट्रम्प यांच्या या विधानाने झेलेन्स्कीनेही आभार मानले.
झेलेन्स्की आणि युद्धाच्या काळातील जीवनशैली
रशियासोबतच्या युद्धामुळे झेलेन्स्कींच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी महागडे सूट घालणाऱ्या झेलेन्स्की यांनी आता सामान्य कपड्यांना प्राधान्य दिलं आहे. हे केवळ त्यांच्या वैयक्तिक निवडीपुरतं मर्यादित नाही, तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या नागरिकांशी असलेल्या त्यांच्या ऐक्याचं प्रतीक आहे.
युक्रेनमधील स्थिती
युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये १०,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि ५०,००० हून अधिक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत, झेलेन्स्कींचा कपड्यांवरील निर्णय हा त्यांच्या देशाच्या परिस्थितीचं प्रतिबिंब आहे.
स्टायलिश कपडे घालणं योग्य नाही
त्यांच्या साध्या पेहरावावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा चर्चा झाली आहे. याआधीही विविध जागतिक परिषदांमध्ये झेलेन्स्की सूटऐवजी साधे कपडे घालून उपस्थित राहिले आहेत, ज्यामुळे अनेकदा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी नेहमीच हे सांगितलं आहे की, युद्ध सुरू असताना स्टायलिश कपडे घालणं योग्य नाही.
ट्रम्प-झेलेन्स्की वाद
या बैठकीत कपड्यांबद्दल चर्चा झाली असली, तरी मुख्य मुद्दा युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा होता. ट्रम्प यांनी युक्रेनला मदत करण्याच्या धोरणांबाबत संभ्रम व्यक्त केला, तर झेलेन्स्की यांनी स्पष्ट शब्दांत रशियाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील मतभेद भविष्यातील आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात.
युद्ध संपल्यावरच सूट घालणार!
झेलेन्स्कींच्या या विधानाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला नवा रंग दिला आहे. युद्धसंपत्तीवर त्यांचा हा ठाम विश्वास दर्शवतो की, युक्रेन अजूनही संघर्षाच्या स्थितीत आहे आणि त्यांना जागतिक सहकार्याची गरज आहे. या चर्चेनंतर आता झेलेन्स्की युद्ध संपल्यावर खरंच सूट परिधान करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.