मार्च 2026 पासून एटीएम मधून 500 रुपयांच्या नोटा निघणार नाहीत ? सरकारकडून मिळाली मोठी माहिती

500 Rupees Note : देशात नोटाबंदी झाल्यापासून सोशल मीडियामध्ये चलनी नोटांबाबत नेहमीच वेगवेगळे मॅसेज व्हायरल होत असतात. अशातच आता पाचशे रुपयांच्या नोटांसंदर्भात सोशल मीडियामध्ये सगळीकडे एक धक्कादायक अन मोठी चर्चा सुरू आहे.

पाचशे रुपयांच्या नोटांबाबत सोशल मीडियामध्ये पोस्ट करून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरलेली आहे. सोशल मीडियामध्ये असा दावा होतोय की येत्या मार्च महिन्यापासून पाचशे रुपयांची नोट एटीएम मधून निघणार नाही.

मार्च 2026 पासून एटीएम मधून पाचशे रुपयांची नोट गायब होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहेत आणि या संदर्भातील ढीगभर पोस्ट आपल्याला सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसतात. यामुळे सहाजिकच आता पुन्हा एकदा सरकार नोटाबंदीचा प्लॅन बनवत आहे की काय अशी भीती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे.

सोशल मीडिया मधील मेसेज खरा असल्याचे अनेकांना वाटते आणि आता पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार धक्का तंत्राचा अवलंब करत पाचशे रुपयांची नोट बंद करू शकते अशा चर्चा सध्या सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेत कमालीची चिंता पाहायाला मिळत असून या संदर्भात आता सरकारकडून मोठी माहिती समोर आली आहे.

सरकारच्या फॅक्ट चेक एजन्सीकडून याबाबत सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. सरकारच्या फॅक्ट चेक एजन्सी कडून अर्थातच पी आय बी कडून माहिती देताना सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होणारा हा मेसेज पूर्णतः चुकीचा असल्याचे सांगितले गेले आहे.

फॅक्ट चेक एजन्सीने सांगितल्याप्रमाणे सध्या सोशल मीडियामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्या पूर्णतः निराधार आहेत. सरकार पाचशे रुपयांची नोट बंद करण्याची कोणतीही योजना आखत नाहीये. तसेच या नोटांना एटीएम मधून हटवण्याचा देखील सरकारचा कोणताच प्लॅन नसल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेक एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पाचशे रुपयांची नोट अजूनही लीगल टेंडर आहे म्हणजेच या नोटाचा वापर खरेदी आणि विक्रीसाठी पूर्णतः वैध आहे. दरम्यान शासनाने सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित आणि भ्रामक बातम्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारच्या भ्रामक बातम्या पडताळणी विना पुढे फॉरवर्ड करू नये असे पण शासनाने यावेळी म्हटले आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या वर्षी केंद्रातील सरकारने छोट्या नोटांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला बँकांना दिला होता. बँकांनी एटीएम मध्ये छोट्या मूल्यांच्या म्हणजेच 100, 200 रुपयांच्या नोटांचे प्रमाण वाढवावे असा सल्ला केंद्रातील शासनाने दिलेला होता. यानुसार बँकांनी शासनाच्या सूचनांचे पालन केले आणि छोट्या मुल्याच्या नोटांची संख्या वाढवली.

मात्र याचा अर्थ असा नाही की शासन पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत आहे. पाचशे रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा सरकारचा कोणताच मानस नाहीये. त्यामुळे सर्वसामान्यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये असे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.