शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी विप्रो कंपनीची मोठी घोषणा! आता हा आर्थिक लाभ मिळणार

Published on -

Wipro News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आयटी कंपनी विप्रोने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विप्रोने आपल्या शेअर होल्डर साठी लाभांश वितरित करण्याची घोषणा केली असून यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत.

मागील काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी कॉर्पोरेट लाभाची घोषणा करताना दिसतायेत.

काही कंपन्या बोनस शेअरची तर काही कंपन्या लाभांश देण्याची घोषणा करत आहेत. दरम्यान आता विप्रो ने देखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित केला जाईल अशी मोठी घोषणा केली आहे.

आज 16 जानेवारी रोजी विप्रो कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकाल जाहीर करतानाच कंपनीने आपल्या शेअर होल्डर साठी लाभांश देण्यात येईल अशी पण माहिती दिली आहे.

खरे तर कंपनीचा तिसरा तिमाही निकाल थोडासा निराशा जनक राहिलेला आहे. कारण की कंपनीचा नफा तब्बल सात टक्क्यांनी घसरला असल्याचे निकालातून जाहीर झाले आहे. मात्र तरीही कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्स ला प्रति शेअर सहा रुपयांचा लाभांश जारी करण्यात आला आहे.

रेकॉर्ड तारीख झाली कन्फर्म

विप्रो गुंतवणूकदारांना सहा रुपयांचा लाभांश देणार आहे. यासाठी 27 जानेवारी रेकॉर्ड तारीख जाहीर झाली आहे. दरम्यान हा लाभांश 14 फेब्रुवारी 2020 पूर्वी पात्र शेअर होल्डर च्या खात्यात जमा होणार अशी पण माहिती समोर आली आहे.

तिमाही निकालात कंपनीच्या महसूल मध्ये वाढ झाली आहे पण नफा सात टक्क्यांनी घसरला. दरम्यान निकाल जाहीर होण्याआधी कंपनीच्या शेअर्समध्ये 2.73 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या शेअरची करंट मार्केट प्राइस 267 रुपये एवढी आहे. आता कंपनीने लाभांश देण्याची घोषणा केली असल्याने येत्या काळात कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे या कंपनीच्या शेअर्सकडे आता विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe