सरकारच्या ह्या योजनेतून ….१५ महिन्यांत दुप्पट होतील तुमचे पैसे !

Kisan Vikas Patra (KVP) ही सरकारची सुरक्षित गुंतवणूक योजना आहे जिथे तुमचे पैसे 115 महिन्यांत दुप्पट होतात. 7.5% वार्षिक व्याजदर, कोणताही बाजार धोका नाही, फक्त ₹1000 पासून सुरुवात करू शकता

Published on -

फक्त इतक्या महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट! अशी घोषणा ऐकली की कोणाचेही कान टवकारतात. पण हे खरंच शक्य आहे का? किंवा यामागे काही क्लृप्ती आहे का? याचं सविस्तर उत्तर मिळवण्यासाठी आपण एक थोडंसं खोलात जाऊन पाहूया आणि जाणून घेऊया एक अशी सरकारी योजना, जी खरं तर १५ नव्हे, पण ११५ महिन्यांत म्हणजे सुमारे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत तुमचे पैसे खात्रीशीरपणे दुप्पट करते नाव आहे किसान विकास पत्र, अर्थात KVP.

ही योजना शेतकऱ्यांसाठी १९८८ साली सुरू झाली होती, पण आता ती देशातील प्रत्येक नागरिकासाठी खुली आहे. KVP चं विशेष आकर्षण म्हणजे सरकारची हमी त्यामुळे कोणतंही बाजारातील चढ-उतार, स्टॉक किंवा म्युच्युअल फंडांमधील जोखीम यापासून गुंतवणूकदार पूर्णपणे दूर राहतो. म्हणजेच, जिथे अनेक योजना आकर्षक व्याजदराचं गाजर दाखवून जोखीम लपवतात, तिथे KVP मात्र पारदर्शकपणे सुरक्षित गुंतवणुकीचं आश्वासन देतो.

सध्या या योजनेवर वार्षिक ७.५% चक्रवाढ व्याज लागू आहे. म्हणजेच, जर तुम्ही आज ₹१,००० गुंतवले, तर ११५ महिन्यांनंतर ते ₹२,००० होतील. आता हे जरी १५ महिन्यांचं ‘दुप्पट’ स्वप्न नसलं, तरी विश्वासार्ह आणि स्थिर परतावा देणारं हे एक सुरक्षित आणि दीर्घकालीन पर्याय ठरतो.

या योजनेत प्रवेश करायचा मार्गही सोपा आहे. फक्त ₹१,००० पासून गुंतवणूक सुरू करता येते. कमाल मर्यादा नाही तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा उद्दिष्टांनुसार कितीही गुंतवू शकता. एकल खातं, संयुक्त खातं किंवा मुलांच्या नावाने सुद्धा खाते उघडता येतं. पालक लहान मुलांसाठी किंवा अपंग व्यक्तींसाठी देखील नावावर खाते उघडू शकतात.

किसान विकास पत्राची आणखी एक खास बाब म्हणजे याचं प्रमाणपत्र दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या शाखेत सहज हस्तांतरित करता येतं. ३० महिन्यांनंतर म्हणजेच दीड वर्षानंतर, काहीशी रक्कम काढणं शक्य होतं, पण संपूर्ण रक्कम दुप्पट होण्यासाठी तुम्हाला ११५ महिने वाट पाहावी लागते. या काळात तुमचं भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहातं आणि हाच या योजनेचा सर्वात मोठा विश्वासाचा दागिना आहे.

ज्या नागरिकांना शेअर बाजारातील चढ-उतार, किंवा म्युच्युअल फंडांची अनिश्चितता झेपत नाही त्यांच्या दृष्टीने ही योजना एक वरदान आहे. गुंतवणूक करताना तुमचं फक्त आधार, पॅन किंवा ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा दिला की काम फत्ते. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये हे सहजपणे करता येतं, आणि आजकाल काही ठिकाणी ऑनलाईन व्यवस्थाही उपलब्ध आहे.

कर नियमांच्या बाबतीत थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. या योजनेवर कलम 80C अंतर्गत करसवलत मिळत नाही, आणि व्याजावर कर भरावा लागतो. मात्र, ही रक्कम टीडीएसशिवाय मिळते त्यामुळे कर भरण्याचं नियोजन स्वतः करावं लागतं. तुम्ही दरवर्षी कर भरू शकता किंवा शेवटी एकरकमी भरू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe