Women Empowerment Scheme : महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन असंख्य योजना राबवते. महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे.
लाडकी बहीण व्यतिरिक्त पण सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात , यातीलच एका महत्त्वाच्या योजनेची आज आपण येथे माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातोय.

कशी आहे शासनाची नवी योजना
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून चर्मकार समाजातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एक विशेष योजना आणली आहे जे अंतर्गत संबंधित समाजातील पात्र महिलांना 50 हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला जातो.
या योजनेला महिला समृद्धी योजना असे नाव देण्यात आले असून याचा लाभ फक्त चर्मकार समाजातील महिलांना मिळतो. यांतर्गत वार्षिक 4% व्याजदराने चर्मकार समाजातील पात्र महिलांना 25 हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा केला जात आहे.
महत्त्वाची बाब अशी की या योजनेच्या माध्यमातून दहा हजार रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजेच 40000 रुपयांचे कर्ज आणि 10,000 रुपयांचे अनुदान असे एकूण 50,000 या योजनेतून संबंधित समाजातील पात्र महिलांना वितरित केले जातात.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चर्मकार समाजातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा आतापर्यंत राज्यातील अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे. या योजनेसाठी लागणारा निधी हा राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ पुरवत आहे.
चामड्यांच्या वस्तू तसेच पादत्राणे उत्पादनाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. महिला ज्या वस्तू तयार करतात त्या वस्तू त्यांना सरकारी विभागांना पुरवठा येतात किंवा खुल्या बाजारात सुद्धा महिला त्या वस्तू विकू शकतात.
या योजनेत विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. या योजनेचा लाभ फक्त चर्मकार समाजातील महिलांनाच मिळतो आणि महिलाचे वय 18 ते 50 असणे आवश्यक आहे. फक्त महाराष्ट्रातील पात्र महिलांना याचा लाभ मिळतो.
या योजनेअंतर्गत ज्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते त्या व्यवसायाचे सदर अर्जदाराला ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील अर्जदारांसाठी उत्पन्न मर्यादा 98 हजार रुपये आहे आणि शहरी भागातील अर्जदारांसाठी एक लाख वीस हजार रुपये आहे.
अर्ज करायचा असल्यास इच्छुक अर्जदारांनी लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेच्या अर्जाचा विहित नमुना हा अर्जदारांना कार्यालयात उपलब्ध होतो.













