Worlds Safety Country : गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे. एकीकडे इजराइल आणि इराण यांच्यात युद्धजन्य स्थिती कायम आहे तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातही युद्ध सुरु आहे. मागे भारत आणि पाकिस्तान या दोन उभय देशांमध्ये देखील तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती.
पाकिस्तानातून झालेल्या दहशतवादी कारवाईच्या विरोधात भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले होते. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर न्यूमबेओ सेफ्टी इंडेक्स 2025 जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जगातील सर्वात सुरक्षित देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या यादीनुसार जगातील टॉप 5 सर्वाधिक सुरक्षित देश कोणते आहेत? यात भारताचा तसेच भारता शेजारील बांगलादेश, पाकिस्तान अन चीन यांसारख्या देशांचा कितवा नंबर लागतो? याबाबतची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 देश कोणते?
न्यूमबेओ सेफ्टी इंडेक्स 2025 मध्ये युरोपियन देश अँडोरा हा 2025 मधील जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून घोषित करण्यात आला आहे. म्हणजेच हा छोटासा देश या यादीत पहिल्या नंबरवर आहे. हा छोटासा देश फ्रान्स आणि स्पेनच्या दरम्यान पायरेनीज पर्वतरांगेत वसलेला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या इंडेक्सनुसार पहिल्या पाच देशांमध्ये तीन अरब देशांचा समावेश आहे. या यादीनुसार अँडोरा या देशाचा सुरक्षा स्कोअर 84.7 इतका असून हा देश या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या युरोपियन कंट्री नंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) 84.5 स्कोरसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो.
या यादीत कतार या देशाचा 84.2 सुरक्षा स्कोरसह तिसरा नंबर लागतो. तैवान या देशाचा 82.9 सुरक्षा स्कोरसह या यादीत चौथा नंबर लागतो आणि ओमान या देशाचा 81.7 सुरक्षा स्कोरसह या यादीत पाचवा नंबर लागतो.
भारताचा नंबर कितवा?
खरे तर या इंडेक्समध्ये एकूण 147 देशांचा समावेश आहे. याच 147 देशांच्या यादीत आपल्या भारताचा 55.7 सेफ्टी स्कोर सह 66 वा नंबर लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे भारताने अमेरिका आणि ब्रिटनला सुद्धा मागे सोडलेले आहे.
सुरक्षेच्या बाबतीत अमेरिका आणि ब्रिटन पेक्षा भारत फार पुढे आहे. कारण की ब्रिटनचा या यादीत 87 वा नंबर आहे आणि अमेरिकेचा 89 वा नंबर आहे. दुसरीकडे भारताशेजारील चीन या यादीत 15 व्या स्थानी आहे. या यादीत बांगलादेश 126, श्रीलंका 59 आणि पाकिस्तान 65 व्या स्थानावर आहे.