Yes बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण ! स्टॉक 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा सल्ला काय?

काही कंपन्यांचे स्टॉक या घसरणीच्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देताना दिसत आहेत. मात्र येस बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. आज शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी येस बँक शेअर 2.60% ने घसरून 17.71 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Published on -

Yes Bank Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान मार्केटमधील या चढउताराचा फटका अनेक कंपन्यांना सुद्धा बसला आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत तसेचं काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हीडंट देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.

यामुळे काही कंपन्यांचे स्टॉक या घसरणीच्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देताना दिसत आहेत. मात्र येस बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. आज शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी येस बँक शेअर 2.60% ने घसरून 17.71 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही मोठी घसरण

आज बीएसई सेन्सेक्स -551.71 अंकांनी घसरून 75,587.26 पातळीवर पोहोचला आहे, तर निफ्टी -205.35 अंकांनी घसरून 22,826.05 वर आहे.

14 जानेवारी 2025 रोजी येस बँकेच्या शेअरची कामगिरी

आज या शेअरची ओपनिंग प्राईस 18.17 रुपये इतकी राहिली आणि उच्चांक 18.29 रुपये अन नीचांकी स्तर 17.65 रुपये इतका राहिला. याचा 52 आठवड्यांतील उच्चांक 29.80 रुपये अन 52 आठवड्याचा नीचांक 17.06 रुपये इतका राहिला. या कंपनीचे मार्केट कॅप हे 55,589 कोटी रुपये इतके आहे. तसेच कंपनीवर एकूण 3,46,737 कोटी रुपये इतके कर्ज आहे.

येस बँकेच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला? येस बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसांत -7.08%, गेल्या 1 महिन्यात -1.72%, गेल्या 6 महिन्यात -26.18%, गेल्या 1 वर्षात -38.29% अन YTD आधारावर (2025 मध्ये) -9.78% घट झाली आहे. तसेच गेल्या 5 वर्षांत या कंपनीचा स्टॉक -54.47% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये यात +43.17% एवढी वाढ नमूद करण्यात आली आहे.

विश्लेषकांचे मत आणि टार्गेट प्राईस

विश्लेषकांनी येस बँक शेअरसाठी 15 ते 18 रुपयांदरम्यान टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. यासाठी ऍव्हरेज टार्गेट प्राईस 16.55 रुपये एवढी निश्चित करण्यात आली असून, याचा शेअर सध्या 17.71 रुपयांवर ट्रेड होत आहे.

गुंतवणूकदारांसाठी पुढील दिशा ?

विश्लेषकांच्या शिफारशींनुसार, येस बँक शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर “होल्ड” किंवा “अंडरपरफॉर्म” रेटिंग दिसत आहे. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 12 पैकी आठ विश्लेषकांनी अंडरपरफॉर्म रेटिंग दिली आहे तर दोन विश्लेषकांनी सेल आणि दोन विश्लेषकांनी होल्ड रेटिंग दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe