रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून कमवू शकतात दुपटीने नफा! गुंतवणूक करताना घरातील महिलांची ‘अशा पद्धती’ने घ्या मदत,नफ्यात होईल वाढ

Published on -

गुंतवणूक आणि आपले भविष्यकालीन आयुष्य यांचा खूप निकटचा संबंध आहे. कारण पैशांशिवाय जीवन जगणे कठीण असते व जीवनामध्ये उत्तम पद्धतीने पैसा आपल्याकडे असावा याकरिता गुंतवणूक खूप गरजेची असते. त्यामुळे बरेच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात व भविष्यासाठीची आर्थिक तरतूद करून ठेवतात. गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत व या पर्यायांमध्ये रियल इस्टेटमधील गुंतवणूक देखील फार मोठ्या प्रमाणावर फायदा देणारी सध्या ठरताना दिसून येत आहे व त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

परंतु रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक करताना तुम्ही घरातील महिलांची मदत घेतली तर महिलांना यामध्ये खूप प्रकारचे फायदे मिळतात. अगदी अशा प्रकारच्या खरेदी विक्रीसाठी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटी पासून ते होमलोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात देखील महिलांना मोठी सूट मिळते. त्यामुळे तुम्हाला एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर ती तुम्ही महिलेच्या नावे जर खरेदी केली तर त्यांना प्राधान्य मिळतेच व फायदे देखील मिळून सुरुवातीलाच तुमचा खूप मोठ्या प्रमाणावर पैसा या माध्यमातून वाचवतो.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना मिळतात हे फायदे

स्टॅम्प ड्युटीत मिळते सवलत –

रियल इस्टेटमध्ये जो काही खर्च येतो किंवा त्यामध्ये गुंतवणुकीसाठी आपल्याला जो पैसा लागतो त्या खर्चामध्ये किंवा पैशांमध्ये स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्कावर करावा लागणारा खर्च मोठा असतो. स्टॅम्प ड्युटी ही मालमत्तेच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा कर असतो. साधारणपणे सहा ते आठ टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क आपल्याला भरावी लागते व ही रक्कम मालमत्तेची किंमत किती आहे त्यानुसार ठरते. परंतु यामध्ये जर तुम्ही महिलांच्या नावाने एखादी मालमत्ता खरेदी केली तर मुद्रांक शुल्क मध्ये तुम्हाला सवलत मिळते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महिलांच्या नावावर एखादी प्रॉपर्टी खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्क्यांपर्यंत सवलत सरकारकडून दिली जाते. तुम्ही महिलांच्या नावावर एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर तुमची लाखो रुपयांची रक्कम या माध्यमातून वाचू शकतो.

होमलोन आणि व्याजदरात मिळते सवलत –

सध्या सर्वसामान्य लोकांना देखील घर खरेदी करणे सोपे झालेले आहे. कारण अनेक बँकांच्या माध्यमातून आता होमलोन ताबडतोब दिले जाते. तसेच प्रत्येक व्यक्तीला एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवणे शक्य नसल्याने होमलोन हा एक उत्तम असा पर्याय यामध्ये ठरतो. समजा तुम्हाला देखील घर घ्यायचे असेल व तुम्ही घरातील एखाद्या महिलेच्या किंवा तुमच्या पत्नीच्या नावाने होमलोन घेतले तर अनेक फायदे या माध्यमातून मिळतात. कारण महिलांसाठी वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून विशेष योजना व ऑफर्स देखील जाहीर केल्या जातात. तसेच पुरुषांच्या तुलनेत बघितले तर महिलांसाठी होमलोन वरील व्याजदर हा 0.20 ते 0.50 टक्क्यांपर्यंत कमी असतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे कर्ज परत करण्याचा म्हणजेच परतफेडीचा कालावधी देखील महिलांना जास्त असते.

करात मिळते सवलत –

समजा पती व पत्नी असे दोघांनी मिळून एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर त्यांना इन्कम टॅक्समध्ये देखील सवलत मिळते. आयकर कायदा कलम 80C आणि कलम 80EE,80EEA अंतर्गत होमलोनच्या परतफेडीवर दीड लाख रुपयापर्यंत कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

सरकारी योजनांचा फायदा मिळवता येतो –

महिलांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करावी व त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. अशाप्रसंगी जर महिलांच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर अशा योजनांचा फायदा तुम्हाला मिळतो. उदाहरण द्यायचे झाले तर अशा योजनामध्ये पंतप्रधान आवास योजना, क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम व बँक व हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या काही योजना असतात त्यांचा देखील फायदा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe