Zodiac Sign : बुध हा नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह आहे. या ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. यामुळे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तसेच नक्षत्र परिवर्तन विशेष महत्त्वाचे ठरते. दरम्यान दहा दिवसांपूर्वी अर्थातच 18 मे 2025 रोजी बुध ग्रहाचा अस्त झाला असून पुढील महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या उदयामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठ्या सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
कधी होणार बुध ग्रहाचा उदय?
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. बुध ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. बुध ग्रह महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करतो.

दरम्यान दहा दिवसांपूर्वी अर्थातच 18 मे 2025 रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत अस्त झाला आहे. आता बुध ग्रहाचा 11 जून 2025 रोजी उदय होईल अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 11 जून च्या दुपारी बाराच्या सुमारास बुध ग्रहाचा मिथुन राशीत उदय होणार आहे आणि ही घटना काही राशीच्या लोकांसाठी फायद्याची ठरेल. बुध राशीच्या उदयामुळे राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.
या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार
वृश्चिक राशी : या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची चाल फायद्याची राहणार आहे. 11 जून पासून या राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. यामुळे या लोकांना अचानक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत पुढील महिना या लोकांसाठी फारच फायद्याचा राहणार आहे.
या लोकांचा अध्यात्माकडे सुद्धा कल राहणार आहे. व्यावसायिक लोक आपल्या स्पर्धकांसोबत स्पर्धा करतील आणि त्यांना चांगले आव्हान देतील. या काळात नवीन इन्कम सोर्स सुद्धा मिळतील. यामुळे पैशांमध्ये आणखी वाढ होणार आहे आणि समाजातील मानसन्मान सुद्धा वाढणार आहे.
सिंह राशी : 11 जून पासून सिंह राशीच्या लोकांना देखील अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत. या लोकांसाठी यापुढील काळ फारच अनुकूल राहणार आहे. ज्योतिष तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती साधता येणार आहे, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून चांगले कौतुक होणार आहे,
तसेच नव्या जबाबदाऱ्या सुद्धा मिळणार आहेत. या काळात या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नवीन इन्कम सोर्स सुद्धा मिळतील ज्यामुळे या लोकांचे पैशांचे टेन्शन कायमचे संपेल. कुटुंबात देखील मोठे आनंदाचे वातावरण राहणार आहे.
मेष : वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच 11 जून पासून मेष राशीच्या लोकांचाही भाग्योदय होणार आहे. या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे आणि कुटुंबात अगदीच मधुरता राहील. भावा-बहिणींमधील दुरावा संपून नाते अधिक घट्ट होईल, यामुळे हे लोक विशेष समाधानी पाहायला मिळतील. नवीन मित्र जोडता येतील आणि सामाजिक वर्तुळ वाढणार आहे.
पैशांच्या बाबतीत पुढील महिना या लोकांसाठी फायद्याचा राहणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात देखील या लोकांना चांगले यश मिळणार आहे. परंतु खर्च करण्यापूर्वी योग्य पद्धतीने विचारविनिमय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे नाहीतर पैशांची बरबादी होण्याची शक्यता आहे.