Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र असे सांगते की नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. म्हणजे नवग्रहातील ग्रह 12 राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात.
दरम्यान नवग्रहांच्या या भ्रमणादरम्यान ते विविध राशींमध्ये मुक्काम करतात. ज्योतिष तज्ञ असे सांगतात की जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात तेव्हा काही शुभ योगांची आणि काही अशुभ योगांची निर्मिती होत असते.

शुभ योगामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांना चांगला फायदा होतो तर अशुभयोगामुळे काही राशीच्या लोकांचे नुकसान सुद्धा होऊ शकते. दरम्यान याचमुळे राशीचक्रातील दोन राशीच्या लोकांचा वाईट काळ आता सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज 26 एप्रिल 2025 रोजी नवग्रहातील शुक्र ग्रह उत्तर भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह सध्या मीन राशीत आहे आणि आता तो उत्तर भाद्रपद नक्षत्रात जाणार असून याचा प्रभाव म्हणून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
या राशीच्या लोकांना सहन करावा लागणार मोठा त्रास
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता संपणार आहे, आजपासून म्हणजे 26 एप्रिल 2025 पासून या लोकांना आपल्या आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे लोक या काळात आपल्या करिअरच्या बाबतीत चिंतेत राहण्याची शक्यता आहे.
या काळात या लोकांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः नातेसंबंधात कडूपणा येण्याची शक्यता आहे यामुळे नातेसंबंध जोपासणे,नात्यांची काळजी घेणे, आपुलकी ठेवणे या राशीच्या लोकांसाठी आवश्यक आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
या राशीच्या लोकांनी या काळात आपल्या वाणीचा जपून वापर करावा. बोलण्यामुळे अनेक गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे म्हणूनच बोलताना विचार करावा. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणून अनावश्यक खर्च टाळणे तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे नाहीतर आर्थिक परिस्थिती सुद्धा डगमगेल. करिअरमध्ये अडचणी तर राहणारच आहे शिवाय बिजनेस मध्ये सुद्धा अडचणी येण्याची शक्यता आहे. पैशांमुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खराब होऊ शकते आणि कुटुंबात सुद्धा फारच चिंतेचे आणि तणावाचे वातावरण तुम्हाला या काळात अनुभवायला मिळणार आहे.
सिंह : कुंभ राशीच्या लोकांप्रमाणेच सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ थोडासा आव्हानात्मक राहणार आहे. आज पासून या लोकांचे वाईट दिवस सुरू होतील असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही कारण की आगामी काही दिवस या राशीच्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
काही गोष्टींची विशेष काळजी यांना घ्यावी लागणार आहे. ग्रहांच्या स्थितीत झालेल्या बदलांमुळे या राशीच्या लोकांचा अनावश्यक खर्च वाढण्याचे शक्यता असून यामुळे पैशांची अडचण पाहायला मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात काही समस्या उदभवतील आणि यामुळे हे लोक तणावात येण्याची शक्यता आहे.
या काळात या लोकांनी खर्च करताना थोडासा विचार करावा नाहीतर कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते आणि यामुळे हे लोक कर्जबाजारी सुद्धा होऊ शकतात. या काळात या लोकांनी बोलण्यावर थोडासा कंट्रोल ठेवायला हवा. पुढील काही दिवस लव लाईफ मध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ या राशीच्या लोकांसाठी आत्तापर्यंतचा सर्वात अवघड काळ ठरू शकतो.