Zodiac Sign : नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच चंद्र ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात. तसेच नवग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते.
महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा नवग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. दरम्यान काल नऊ जुलै 2025 रोजी चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन झाले आहे. नऊ जुलै रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन झाले आहेत.

चंद्र ग्रहाने आता धनु राशीत प्रवेश केला आहे. यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. दरम्यान आता आपण चंद्रग्रहाच्या राशी परिवर्तनाचा कोणकोणत्या राशीच्या लोकांना फायदा मिळणार याचा आढावा घेणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
मकर : दहा जुलैपासून या राशीच्या लोकांना चांगले यश मिळणार आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होईल. या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहणार असून आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे. या लोकांची आर्थिक परिस्थिती आता सुधारणार आहे. समाजातला मानसन्मान आणखी वाढणार आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ फायद्याचा राहणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मानसिक तणाव दूर होण्याचे संकेत मिळत आहे. परदेशात जाण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. या लोकांच्या कुटुंबात एखादे शुभ कार्य निघू शकते यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह : मकर राशीच्या लोकांप्रमाणेच सिंह राशीच्या लोकांना देखील चांगला लाभ मिळणार आहे. आतापर्यंतची प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. या लोकांच्या आर्थिक अडचणी सुद्धा या काळात दूर होतील. या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होणार आहे.
आत्मविश्वासात वाढ होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत हे लोक दूरवरचे प्रवास करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनची भेट मिळू शकते म्हणून आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे. जे लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना गुड न्यूज मिळू शकते.
मिथुन : सिंह आणि मकर राशीच्या लोकांप्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांना देखील चांगला लाभ मिळणार आहे. या लोकांचा वाईट काळ देखील आता समाप्त होईल. या लोकांच्या मनातील बहुतांशी इच्छा आता पूर्ण होतील. सध्याचा काळ गुंतवणुकीसाठी विशेष अनुकूल आहे.
या काळात विद्यार्थ्यांना देखील चांगल यश मिळणार आहे विशेषता जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.