Zodiac Sign : नवीन वर्षाचा पहिला महिना ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा राहणार आहे. कारण की या महिन्यात असा एक अद्भुत राजयोग तयार होणार आहे ज्यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल.
जसं की आपणास ठाऊकच आहे की नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या चाली अनेकदा शुभ आणि अशुभ योग तयार करतात.

दरम्यान 15 जानेवारी 2026 रोजी असाच एक नवा शुभ योग तयार होणार आहे. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी शुक्र आणि शनी ग्रह लाभदृष्टी योग तयार करणार आहेत.
नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर 15 जानेवारी रोजी शुक्रा आणि शनी ग्रह 90 अंशाचा कोन तयार करणार आहेत.
म्हणजेच हे दोन्ही ग्रह या दिवशी एकमेकांपासून 90° वर असतील. यामुळे नवा लाभदृष्टी योग तयार होईल आणि याचा तीन राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळणार आहे.
आता आपण या नव्या योगाचा नेमका कोणाला फायदा होणार आणि नवीन वर्षाची सुरुवात कोणासाठी फायदेशीर ठरणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल
तूळ : या राशीच्या लोकांचा वाईट काळ नवीन वर्षात संपेल. या राशीच्या लोकांचे काही महत्त्वाचे प्लॅन नव्या वर्षात पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना तसेच व्यवसायिकांना या काळात चांगला लाभ मिळणार आहे. नोकरदार मंडळीला प्रमोशन , बोनस तसेच पगार वाढ अशा आनंददायी वार्ता ऐकायला मिळतील.
या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायिकांना देखील या काळात चांगले यश मिळणार आहे. नवीन डील, पार्टनरशिप आणि चांगला नफा मिळवण्याची संधी या लोकांना उपलब्ध होईल. अचानक धन लाभाचे देखील संकेत मिळत आहेत. पैशांची बचत करण्यात देखील हे लोक यशस्वी होणार आहेत.
मकर : या राशीच्या जातकांचा वाईट काळ सुद्धा संपणार आहे. नवीन वर्ष या लोकांसाठी विशेष आनंदाचे राहणार आहे. या लोकांचा सेल्फ कॉन्फिडन्स या काळात हाय राहणार आहे. जे लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या पगाराची नवीन नोकरी मिळू शकते.
आधीपासूनच नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची भेट मिळू शकते. व्यवसायातून देखील चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात देखील मोठे उत्साहाचे वातावरण राहणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे या काळात पूर्ण होतील. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग सुद्धा तयार होण्याची शक्यता आहे.
कन्या : या राशीच्या दातकांसाठी 15 जानेवारी नंतरचा काळ विशेष अनुकूल राहणार आहे. जे लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत बेरोजगार आहेत त्यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या लोकांचा इन्कम सुद्धा वाढणार आहे.
अचानक धनं लाभ होण्याचे योग तयार होतील. पैशांच्या दृष्टिकोनातून पुढील काही दिवस या लोकांसाठी फायद्याचे राहतील. आर्थिक तंगीतून मुक्ती मिळेल. आरोग्यबाबत देखील हा काळ अनुकूल राहील. कुटुंबातही अगदीच प्रसन्न वातावरण पाहायला मिळणार आहे. वैवाहिक जीवन अधिक मधुर होईल अशी आशा आहे.