Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील नवग्रहांमध्ये मंगळ या ग्रहाला देखील मोठा मान आहे. इतर ग्रहांप्रमाणेच मंगळ ग्रहाचे सुद्धा वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा – केव्हा मंगळ ग्रहाचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील इतर राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळत असतो. दरम्यान येत्या काही दिवसांनी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.
या दिवशी होणार मंगळाचे गोचर
28 जुलै 2025 रोजी मंगळ ग्रह राशी गोचर करणार आहे. या दिवशी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मंगळ ग्रहाचे कन्याराशीत गोचर होणार असल्याची माहिती ज्योतिष तज्ञांनी दिली आहे.

मंगळ ग्रहाचे कन्या राशीत गोचर झाल्यानंतर काही राशींना अच्छे दिन येणार आहेत. काही राशीच्या लोकांच्या आत्तापर्यंतच्या विविध अडचणी दूर होतील आणि त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळणार आहे.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
वृश्चिक : मंगळ ग्रहाच्या कन्याराशीमधील गोचर मुळे या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. 28 जुलै नंतर या राशीच्या लोकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. या काळात या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन सोर्स उपलब्ध होणार आहेत. या लोकांना आपल्या मित्रांकडून या काळात संपूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या साथीने हे लोक या काळात चांगले यश संपादित करतील. सामाजिक क्षेत्रात देखील या लोकांचा मोठा नावलौकिक होणार आहे.
कर्क : वृश्चिक प्रमाणेच या राशीच्या लोकांना देखील 28 जुलै नंतर चांगले यश मिळणार आहे. या काळात या राशीच्या लोकांचे धैर्य वाढेल आणि आत्मविश्वासात देखील मोठी वाढ होणार आहे. हे लोक या काळात दूरवरचे प्रवास करू शकतात. या लोकांना या काळात आपापल्या क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे.
जे लोक लेखन करतात किंवा संवाद क्षेत्रात कार्यरत आहेत अशा लोकांना या काळात चांगले यश मिळेल. मात्र या लोकांचे आपल्या लहान भावंडांसोबत मतभेद होण्याची शक्यता देखील आहे आणि म्हणूनच या बाबतीत या लोकांनी विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
मेष : वर सांगितलेल्या दोन राशीप्रमाणेच मेष राशीच्या लोकांचाही लवकरच सुवर्ण काळ सुरू होणार आहे. हा काळ या राशीच्या लोकांसाठी मोठा अनुकूल राहणार आहे. या काळात या लोकांचे धैर्य आणि पराक्रम वाढेल असे सांगितले गेले आहे. या काळात हे लोक आपल्या शत्रूवर वरचढ ठरू शकतात.
या काळात हे लोक आपले कर्ज देखील फेडतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हा काळ विशेष फायद्याचा राहणार आहे. या काळात या लोकांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली यश मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहणार असला तरी देखील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.