Zodiac Sign : ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील शनि हा ग्रह सर्वात धिम्या गतीने राशी परिवर्तन करतो. शनी ग्रह एका राशीत तब्बल अडीच वर्षांसाठी राहतो. दुसरीकडे चंद्र हा एक असा ग्रह आहे जो की जलद गतीने राशी परिवर्तन करतो. हा ग्रह फक्त अडीच दिवस एका राशीत राहतो.
यामुळे एका महिन्यात चंद्रग्रहाचे अनेक वेळा राशी परिवर्तन होते. मात्र असे असले तरी इतर ग्रहांप्रमाणेच चंद्रग्रहाचे राशी परिवर्तन सुद्धा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव टाकते.

दरम्यान उद्या अर्थातच 28 जुलै 2025 रोजी पुन्हा एकदा चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. पंचांगातून प्राप्त माहितीनुसार उद्या 28 जुलै रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटानंतर चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.
चंद्र ग्रह यावेळी कन्या राशीत विराजमान होईल. खरंतर कन्या राशीत आधीपासूनच मंगळ ग्रह विराजमान आहे आणि यामुळे मंगळ आणि चंद्राच्या युतीमधून महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे.
महालक्ष्मी राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा
धनु : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष अनुकूल सिद्ध होणार आहे. उद्यापासून म्हणजे 28 जुलैपासून या राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. उद्यापासून पुढील दोन-तीन दिवस या राशीच्या लोकांसाठी लाभाचे ठरतील. या काळात हे लोक धार्मिक कार्यात सहभाग नोंदवतील.
नोकरीच्या ठिकाणी या लोकांना चांगले यश मिळणार आहे. गुंतवणुकीतून या लोकांना चांगला लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना विशेषता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात.
कर्क : धनु राशीच्या लोकांप्रमाणेच कर्क राशीच्या लोकांनाही या काळात चांगले लाभ मिळणार आहे. हे लोक आपआपल्या क्षेत्रात चांगली प्रगती करतील. मात्र असे असले तरी मेहनतीला शॉर्टकट राहणार नाही.
नोकरीच्या ठिकाणी या लोकांना चांगले यश मिळणार आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील हा काळ अनुकूल राहणार आहे. कुटुंबात अगदीच आनंदाचे वातावरण राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत हे लोक दूरवरचे प्रवास करतील.
मेष : कर्क आणि धनु राशीच्या लोकांप्रमाणेच मेष राशीच्या लोकांनाही या काळात चांगले लाभ मिळणार आहेत. या लोकांच्या आर्थिक अडचणी या काळात दूर होतील. आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे.
बेरोजगार लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. या काळात अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. एकंदरीत या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे.